T20 World Cup : विराट-अनुष्‍काच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी, अजून कोणाची अटक का नाही? महिला आयोगाचा प्रश्न

T20 World Cup : T20 विश्वचषकात (T20 World Cup) टीम इंडियाला (Team India) सलग दोन सामन्यात पराभूत व्हावं लागले आहे. यामुळे सोशल मीडिया (Social Media) वर टीम इंडियावर जोरदार टीका होत आहे.

Virat-Anushka's daughter threatened to be raped,
विराट-अनुष्‍काच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • टी-20 विश्वचषकात सलग दोन सामने गमावल्यानंतर टीम इंडिया ट्रोल होत आहे.
  • विराट कोहलीवर क्रिकेट चाहते संतापले आहेत.
  • आता काही लोकांनी अनुष्काच्या अंगावर असलेल्या मुलीला टार्गेट केले आहे.

T20 World Cup :  नवी दिल्‍ली : T20 विश्वचषकात (T20 World Cup) टीम इंडियाला (Team India) सलग दोन सामन्यात पराभूत व्हावं लागले आहे. यामुळे सोशल मीडिया (Social Media) वर टीम इंडियावर जोरदार टीका होत आहे. टीकाकारांच्या हिटलिस्टवर सर्वप्रथम आहे कर्णधार  विराट कोहली (Captain Virat Kohli). परंतु या टीकाकारांनी टीकेची खालची पातळी गाठली आहे. दिल्ली महिला आयोगाच्या (Delhi Commission for Women) प्रमुख स्वाती मालीवाल (Chief Swati Maliwal) यांनी खूप संतापजनक ट्विट(Tweet) पाहिले आहेत. मालीवाल यांच्या निदर्शनात आली आहेत, ज्यात विराटच्या नऊ महिन्याच्या मुलीवर बलात्कार करण्याच्या धमक्या दिल्या गेल्या आहेत. या प्रकरणी मालीवाल यांनी दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राइम ब्रांचला पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

काय आहे प्रकरण? 

मालीवाल यांच्या पत्रानुसार पाकिस्तानविरुद्धाच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर विराटची नऊ महिन्याची मुलीवर बलात्कार करण्याची धमकी ऑनलाईन पद्धतीने दिल्या जात आहेत. मालीवाल यांनी आपल्या पत्रात लिहिले की, विराटला टार्गेट यासाठी केलं जात आहे कारण भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीवर धर्माच्या आधारे टीका केली जात होती, त्यावेळी कोहलीने टीका करणाऱ्यांना सुनावले होते.     

दिल्ली पोलिसांकडे काय आहे मागणी ?

डीसीडब्ल्यूच्या प्रमुखांनी दिल्ली पोलिसांकडून याप्रकरणाच्या एफआयआर विषयी माहिती मागितली आहे. आयोगाला माहिती करून घ्यायचे आहे की, या प्रकरणात कोणत्या आरोपींना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. मालीवाल म्हणाल्या आहेत, जर कोणत्याच अटकेची कारवाई झाली नसेल तर पोलिसांनी या प्रकरणात काय काम केले आहे, याची माहिती द्यावी. महिला आयोगाने दिल्ली पोलिसांकडून या प्रकरणाचा 8 नोव्हेंबरपर्यंत सविस्तर अहलवाल मागितला आहे.

   

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी