Virat Kohli Odi International Runs: विराट कोहली (Virat Kohli)एकदिवसीय क्रिकेटमधील (ODI cricket) सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे. आज श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) वनडे मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. या तिरुवनंतपुरम (Thiruvananthapuram)सामन्यादरम्यान विराट कोहलीने वनडे क्रिकेटमधील आणखी एक मोठा विक्रम केला आहे. यामुळे आता आम्हा पत्रकारांच्या तोंडून उत्स्फूर्तपणे विराट भाऊ जोमात दिग्गज क्रिकेटर हे वाक्य आल्याशिवाय राहत नाही. (Virat kohali's record: Kohli has reached the list of top players in the world )
अधिक वाचा : नेपाळमध्ये विमान कोसळलं; 40 प्रवाशांचा मृत्यू
आज तिरुवनंतपुरम येथे खेळाला जात असलेला तिसरा एकदिवसीय सामना हा विराटच्या विक्रमाने स्मरणात राहणार आहे. विराट कोहलीने या सामन्यात नाबाद राहत 166 धावांची खेळी केली. कोहली आणि शुभमन गिल यांच्या धडाकेबाज खेळीमुळे भारताने श्रीलंकेसमोर 391 धावांचे आव्हान ठेवलं. या सामन्यात कोहलीने केलेल्या धमाकेदार फलंदाजीने दिग्गज खेळाडूंचे विक्रम तोडकं वाटू लागलं आहे.
कोहली जगातील 5 सर्वात यशस्वी वनडे फलंदाजांच्या यादीत प्रवेश केला आहे. त्याने श्रीलंकेचा अनुभवी खेळाडू महेला जयवर्धनेला मागे टाकले आहे. महेला जयवर्धनेने एकदिवसीय सामन्यांमध्ये 448 सामन्यात एकूण 12650 धावा केल्या आहेत. आता कोहलीने या धावांचा आकडा पार केला आहे. तर वनडेमध्ये सचिन तेंडुलकर यांनी सर्वाधिक धावा केल्या आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी 463 सामन्यांमध्ये 18426 धावा केल्या आहेत.
अधिक वाचा : Mumbai Marathon 2023 : 'या' खेळाडूने जिंकली मुंबई मॅरेथॉन
विराट कोहलीचा जबरदस्त फॉर्म या मालिकेतही कायम आहे. या सामन्यापूर्वी त्याने 267 एकदिवसीय सामन्यांमध्ये 12588 धावा केल्या होत्या. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने 62 धावांचा आकडा गाठताच एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत त्याने महेला जयवर्धनेला मागे टाकले आहे. विराटच्या या खेळीपूर्वी महेला जयवर्धने वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत ५व्या स्थानावर होता, मात्र आता विराटने हे स्थान गाठले आहे.
अधिक वाचा : दीपप्रज्वलन करताना सुप्रिया सुळेंच्या साडीला आग
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर एदकिवशीय जबरदस्त विक्रम करणार फलंदाज आहे. सचिन तेंडुलकरने एकदिवसीय सामन्यात 49 शतकं आणि कसोटी सामन्यात 51 शतकं केली आहेत. सचिन तेंडुलकर यांच्या एकदिवसीय विक्रमापासून विराट कोहली चार हात लांब असून येत्या काही सामन्यात तो हे अंतर कापून आपल्या नावावर नवा विक्रम करेल यात शंका नाही. देशांतर्गत मैदानावर विराटने सर्वाधिक शतकं ठोकली आहेत.
विराट कोहली हा धावा करण्याचा भुकेला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कोहलीच्या स्टाइट्र रेट पाहिल्यानंतर तो फलंदाजीत किती निपुण आहे हे आपल्या लक्षात येतं. कोहलीने सहा समान्यांमध्ये 150 चा आकडा पार केला आहे. त्यातील चार सामन्यात 150 चा आकडा पार करताना विराट नाबाद राहिला आहे.
देश | धावा | वर्ष |
न्यूझीलंडविरुद्ध | 154 नाबाद | 2016 |
वेस्ट इंडिजविरुद्ध | 157नाबाद | 2018 |
दक्षिण आफ्रिकाविरुद्ध | 160 नाबाद | 2018 |
पाकिस्तानविरुद्ध | 183 | 2012 |
श्रीलंकाविरुद्ध | 166 नाबाद | 2023 |
विराटने एकदिवसीय सामन्याच्या करिअरमध्ये 45 शतकं केली आहेत. तर अर्धशतकांचा आकडा 65 पार केला आहे. तसेच टी20 आणि कसोटी सामन्यातही विराटच्या धावांचे आकडे खूप भारी आहेत. विराट कोहलीने टीम इंडियासाठी आतापर्यंत 104 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 48.91 च्या सरासरीने 8119 धावा केल्या आहेत. यात कोहलीने 28 अर्धशतके आणि 27 शतके झळकावली आहेत. त्याचबरोबर 115 टी-20 सामन्यांमध्ये 52.74 च्या सरासरीने 4008 धावा केल्या आहेत.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्यात सचिन तेंडुलकर आघाडीवर आहे. वनडेत सचिन तेंडुलकरच्या एकूण 18426 धावा आहेत. यानंतर या यादीत श्रीलंकेच्या कुमार संगकाराचे नाव आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण 14234 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर रिकी पाँटिंगने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 13704 धावा केल्या आहेत. त्यानंतर सनथ जयसूर्याने 13430 धावा केल्या आहेत.