India vs Bangladesh: विराट कोहलीची नवी रेकॉर्ड ब्रेक कामगिरी 

Virat Kohli become first asian to score 5000 test runs as captain: टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं शुक्रवारी बांगलादेशविरूद्ध पिंक बॉल टेस्ट दरम्यान आणखी एक कामगिरी आपल्या नावावर केली आहे. 

Virat Kohli
India vs Bangladesh: विराट कोहलीची नवी रेकॉर्ड ब्रेक कामगिरी   |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

  • विराट कोहलीनं यापूर्वी कॅप्टन म्हणून बॅटिंगमध्ये अनेक विक्रम नोंदवले आहेत.
  • कोलकात्ताच्या ईडन गार्डन्समध्ये बांग्लादेशविरूद्ध डे-नाइट टेस्ट दरम्यान बॅटिंग करताना आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
  • पिंक बॉल टेस्टच्या पहिल्या डावात 32 धावसंख्या करत कॅप्टन विराट कोहलीनं टेस्ट क्रिकेटमध्ये पाच हजार धावा पूर्ण केल्यात.

कोलकात्ताः विराट कोहलीनं यापूर्वी कॅप्टन म्हणून बॅटिंगमध्ये अनेक विक्रम नोंदवले आहेत. याच क्रमात पुढे जात त्यानं कोलकात्ताच्या ईडन गार्डन्समध्ये बांग्लादेशविरूद्ध डे-नाइट टेस्ट दरम्यान बॅटिंग करताना आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. पिंक बॉल टेस्टच्या पहिल्या डावात 32 धावसंख्या करत कॅप्टन विराट कोहलीनं टेस्ट क्रिकेटमध्ये पाच हजार धावा पूर्ण केल्यात. विराट या रेकॉर्डवर सर्वात वेगानं पोहोचणारा कॅप्टन ठरला आहे. त्यानं आपल्या कॅप्टनशिपच्या 86 व्या डावात खेळताना हा रेकॉर्ड केला. 

कोलकात्ता टेस्टच्या आधी विराट कोहलीनं टेस्ट क्रिकेटमध्ये 52 टेस्टच्या 85 डावात 4968 धावा पूर्ण केल्या होत्या. विराट हे यश मिळवणारा पहिला भारतीय आणि जगातील सहावा खेळाडू बनला आहे. विराटच्या आधी कॅप्टन म्हणून टेस्ट क्रिकेटमध्ये पाच हजारांहून जास्त धावसंख्या दक्षिण आफ्रिकेचा ग्रीह्म स्मिथ, ऑस्ट्रेलियाचा ऐलन बॉर्डर आणि रिकी पॉन्टिंग, वेस्ट इंडिजचा क्लाइव लॉयड आणि न्यूजीलंडचा स्टीवन फ्लेमिंग यांनी केल्यात. विराटच्या आधी कोणत्याही आशियाई कॅप्टन या रेकॉर्डपर्यंत पोहचू शकला नाही आहे. 

कॅप्टन म्हणून सर्वाधिक कसोटी धावा

 

खेळाडू सामना डाव धावा
       
ग्रीह्म स्मिथ   109 193   8659
एलन बॉर्डर 93 154 6623
रिकी पॉन्टिंग 77 140 6542
क्लाइव लॉयड 74 111 5233
स्टीवन फ्लेमिंग 80 135 5156 
विराट कोहली 53 86  5000*

विराटनंतर भारतासाठी टेस्ट क्रिकेटमध्ये कॅप्टनशिपमध्ये सर्वात जास्त रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर एमएस धोनी आहे. धोनीनं 60 टेस्टमध्ये टीमची कमान सांभाळत 3454 धावा केल्या होत्या. त्यानंतर या यादीत तिसऱ्या स्थानावर सुनील गावस्कर आहेत. त्यांनी 47 टेस्ट सामन्यात भारतीय टीमचं कॅप्टनशिप सांभाळत 3449 धावा केल्या होत्या. 

विराटनं दक्षिण आफ्रिकेविरूद्ध रांची टेस्टमध्ये नाबाद 254* धावसंख्येच्या डावादरम्यान टेस्ट क्रिकेटमध्ये 7 हजार पूर्ण केले होते. त्यानं आपल्या करिअरमध्ये 31 टेस्ट सामन्यात 2098 रन केले होते. या कालावधीत त्याची सरासरी 41.14 होती. मात्र कॅप्टनशिप सांभाळत त्याच्या खेळात वेगळीच चमक आली आणि पुढच्या 53 टेस्टमध्ये त्यानं 63च्या सरासरीनं 5 हजार धावा केल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी