मुंबई पोलीस दलाला मदतीचा हात, विरुष्काने केली 'इतक्या' लाखांची मदत

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated May 10, 2020 | 19:26 IST | टाइम्स नाऊ हिंदी

कोरोना विरोधातील लढाईत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्माने दुसऱ्या वेळेस मदत केली आहे. या वेळी दोघांनी मुंबई पोलिसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत केली आहे.

Virat kohali and Anushka Sharma Donates Five Lakhs Each To Mumbai Police
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा  

थोडं पण कामाचं

  • विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या प्रसिद्ध दाम्पत्याने मुंबई पोलीस दलाला केली आर्थिक मदत
  • दोघांकडून देण्यात आले प्रत्येकी पाच लाख रुपये
  • मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची माहिती

मुंबई: शहराचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांना सांगितले की, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी मुंबई पोलीस दलाला वैयक्तिक पाच-पाच लाख रुपयांची म्हणजेच एकूण दहा लाख रुपयांची मदत केली आहे. सिंह यांनी त्यांच्या ट्वीटर हॅडलवर विराट आणि त्याच्या पत्नीचे आभार मानतांना म्हटले, कोरोनाविरोधात लढण्यात येणाऱ्या लढाईत मुंबई पोलीस दलाला आपली मदत नक्कीच बळ देईल. यापूर्वी विराट आणि अनुष्काने पीएम केअर्स फंड तसेच मुख्यमंत्री साहय्यता कोषला मदत केली आहे. यातील रक्कमेचा मात्र उल्लेख करण्यात आलेला नाही. 

विराट म्हणाला, कोरोना संपल्यानंतर पुढील काळात जगभारात प्रेक्षकांविना क्रिकेटचे सामने खेळवले जाऊ शकतात. यामुळे खेळाडूंच्या मानसिकतेवर कुठलाही परिणाम जरी होणार नसला तरी सामन्याच्या वेळी स्टेडिअममध्ये प्रेक्षकांच्या उद्घोषांमुळे तसेच उपस्थितीमुळे जे वातावरण तयार होते ते मात्र नसेल. अनेक देशांच्या क्रिकेट संघटना स्टेडिअममध्ये प्रेक्षकांविना समना खेळविता येईल का? याचा विचार करत आहे. नजिकच्या काळात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकादरम्यान स्टेडिअममध्ये प्रक्षेकांशिवाय सामने खेळविल्या जाण्याची दाट शक्यता आहे. 

'...मात्र असा निर्णय घेणे नक्कीच सोपे नसेल'

स्टार स्पोर्टसमधील एका शोमध्ये बोलतांना विराट कोहलीने म्हटले की, प्रेक्षकांविना सामने खेळविने हे कदाचित शक्यही होऊ शकते. मी याबद्दल खात्रीने सांगू शकत नाही. 
प्रत्येक क्रिकेटप्रेमी या निर्णयाकडे कशा पद्धतीने बघतो हा ज्याचा त्याचा दृष्टीकोन आहे. पंरतू आम्हा खेळाडूंना प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडिअममध्ये खेळण्याची इतकी सवय झाली आहे की, प्रेक्षकांविना खेळने आमच्यासाठी नक्कीच अवघड असणार आहे. कारण तेव्हा स्टेडिअममध्ये पहिल्या सारखे वातावरण नसेल. 

'ते' दोन सामने माझ्या अतिशय जवळचे

स्टार स्पोर्टसवरील क्रिकेट कनेक्टेड या शोमध्ये बोलतांना कोहली म्हणाला की सामन्याचे महत्व आणि प्रत्यक्ष सामन्यावेळी रंजक वातावरणाचा विचार करावायचा झाल्यास २०११ च्या विश्वचषकातील अंतिम सामना आणि २०१६ टी-२० विश्वचषकातील उपांत्य पूर्व सामना हे दोन सामने माझ्या सदैव लक्षात राहतील. कोरोना व्हायरसच्या प्रादूर्भावामुळे सध्या जगभरातील क्रिकेटचे सर्व सामने रद्द करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी