विराट कोहली आणि तमन्ना भाटियाला अटक करण्याची मागणी, मद्रास हायकोर्टात याचिका दाखल 

Virat Kohli arrest: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया यांच्या विरूद्ध अटकेसाठी मद्रास हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. दोघांवर ऑनलाइन सट्टेबाजी प्रमोट केल्याचा आरोप आहे

petition filed against Virat kohli
विराट कोहलीला अटक करण्याची मागणी  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली  (Virat Kohli)आणि बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया ( tamannah bhatia) यांच्या विरूद्ध अटकेसाठी मद्रास हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.
  • कोहली आणि तमन्ना यांच्यावर ऑनलाइन सट्टेबाजी प्रमोट केल्याचा आरोप आहे.
  • चेन्नईच्या एका वकीलाने ही याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्याने मद्रास हायकोर्टात (Madras High Court)ऑनलाइन सट्टेबाजीवर बंदी घालण्याचा आदेश देण्यात यावे अशी मागणी केली आहे

चेन्नई :  टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली  (Virat Kohli)आणि बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया ( tamannah bhatia) यांच्या विरूद्ध अटकेसाठी मद्रास हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. कोहली आणि तमन्ना यांच्यावर ऑनलाइन सट्टेबाजी प्रमोट केल्याचा आरोप आहे.  चेन्नईच्या एका वकीलाने ही याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्याने मद्रास हायकोर्टात (Madras High Court)ऑनलाइन सट्टेबाजीवर बंदी घालण्याचा आदेश देण्यात यावे अशी मागणी केली आहे. यामुळे तरूण वर्गाला या ऑनलाइन सट्टेबाजीची सवय लागते असे त्यांचे मानणे आहे. 

याचिकेत पुढे म्हटले आहे की, ऑनलाइन सट्टेबाजी कंपनी विराट कोहली आणि तमन्ना भाटिया सारख्या स्टार्सचा वापर करतात. त्यामुळे तरुणांची डोकी खराब होतात. त्यामुळे अशा प्रकारच्या जाहिराती केल्यामुळे त्यांना अटक केली पाहिजे. वकीलाने अशा एका केसकडे कोर्टाचे लक्ष वेधले ज्यात एका तरूणाने ऑनलाइन सट्टेबाजीची रक्कम देता आली नाही म्हणून आत्महत्या केली होती. 

मोबाईल प्रिमिअर लीगचा करत होता प्रचार 

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया दोघेही मोबाईल प्रिमिअर लीग या अॅपचा प्रचार करत होते. कोहली आणि तमन्ना हे दोघे गेमिंग प्लॅटफॉर्मचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. एमपीएलचे सध्या ३ कोटी ५० लाखांपेक्षा अधिक युजर्स आहेत. या प्लॅटफॉर्मवर ४० पेक्षा जास्त गेम्स आहेत. आयपीएलपूर्वी एमपीएलकडे ६ क्रिकेट गेम्स आहे. त्यामुळे युजर्सला जास्त पर्याय उपलब्ध होतो. 

आयपीएलच्या तयारीला लागला आहे कोहली 

दरम्यान, कर्णधार विराट कोहली सध्या आगामी आयपीएलच्या तयारीत व्यस्त आहे. आयपीएल २०२० यूएईमध्ये १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबरपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. आरसीबी या आपल्या फ्रेंचायझीला पहिला खिताब मिळवून देण्याचा  कोहलीचा प्रयत्न असणार आहे. यापूर्वी तो अहमदाबाद येथे टीम इंडियाच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये भाग घेऊ शकतो. कोहली लॉकडाऊनच्या काळात आपली पत्नी अनुष्कासोबत मुंबईतच होता. आतापर्यंत त्याने ऑउटडोअर ट्रेनिंग सुरू केलेली नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी