महेंद्रसिंह धोनी निवृत्ती घेणार? पाहा पराभवानंतर विराट कोहलीने काय दिलं उत्तर 

MS Dhoni Retirement: महेंद्रसिंह धोनी या विश्वचषकानंतर निवृत्त होणार असल्याची चर्चा सुरु होती. याचबाबत कर्णधार विराट कोहलीला प्रश्नही विचारण्यात आला होता. याबाबत कोहली नेमकं काय म्हणाला ते जाणून घ्या.

MS_Dhoni_AP
महेंद्रसिंह धोनी निवृत्ती घेणार?  |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

  • धोनीने ९ सामन्यात ८ डावांमध्ये ४९ च्या सरासरीने २४५ धावा केल्या
  • सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध धोनीने ७२ चेंडूत ५० धावा केल्या
  • धोनीने जडेजाच्या साथीने आठव्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी केली. 

मेन्चेस्टर: न्यूझीलंडविरुद्ध सेमीफायनल सामन्यात १८ धावांनी पराभव स्वीकाराव्या लागलेल्या भारतीय संघाचा विश्वचषक २०१९ मधील  प्रवास इथेच संपला आहे. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने विश्वचषकाची सुरुवात अतिशय झोकात केली होती. पण त्याचा अंत अतिशय दु:खदायक झाला आहे. मंगळवारी टॉस जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघाने बुधवारी रिजर्व डेच्या दिवशी टीम इंडियासमोर विजयासाठी ५० ओव्हरमध्ये २४० धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या माफक धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. भारताची टॉप ऑर्डर ही यावेळी पूर्णपणे ढेपाळली. अवघ्या ३.१ ओव्हरमध्ये फक्त ५ धावांवर भारताने रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल हे तीन दिग्गज फलंदाज माघारी परतले. 

या धक्क्यातून भारतीय संघ सावरतोय न सावरतोय तोच २४ धावांवर भारताला दिनेश कार्तिकच्या रुपाने आणखी एक धक्का बसला. यामुळे भारतीय संघाच्या अडचणी या वाढतच गेल्या. हार्दिक पांड्या आणि रिषभ पंत यांनी डाव सावरण्याचा बराच प्रयत्न केला पण त्यांची भागीदारी देखील २३ व्या ओव्हरमध्ये तुटली. तेव्हा भारताच्या फक्त ७१ धावा झाल्या होत्या. यानंतर सातव्या क्रमांकावर एमएस धोनी फलंदाजीसाठी उतरला आणि त्याने सामन्याची सूत्रं आपल्या हातात घेतली. 

धोनी मैदानात आल्यानंतर त्याने हार्दिक पांड्याच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. सातव्या विकेटसाठी त्याने २१ धावांची खेळीही केली. पण एक मोठा मारण्याच्या नादात हार्दिक बाद झाला. पण त्यानंतर मैदानात आलेल्या जडेजाने संपूर्ण सामन्याचं चित्रच बदलून टाकलं. जडेजाने तुफानी फलंदाजी करत अर्धशतक झळकावलं. या दोघांनी आठव्या विकेटसाठी ९७ चेंडूत १०० धावांची भागीदारी देखील केली. त्यामुळे भारताची धावसंख्या २०० पर्यंत पोहचली. पण ४८ व्या ओव्हरमध्ये बोल्टला षटकार मारण्याच्या नादात जडेजा बाद झाला. त्याने ५९ चेंडूत ७७ धावांची जिगरबाजी खेळी केली. धोनी आणि जडेजाने १०४ चेंडूत ११६ धावांची भागीदारी केली. 

दरम्यान ४८ व्या ओव्हरमध्ये धोनी हा मार्टिन गप्टिलने केलेल्या एका अचूक थ्रोमुळे रन आऊट झाला. इथेच न्यूझीलंडने सामना खऱ्या अर्थाने जिंकला. यावेळी धोनीने ७२ चेंडूत ५० धावा केल्या. आपल्या या खेळीत धोनीने अतिशय महत्त्वाची भूमिका निभावली. त्याच्या या खेळीमुळेच भारतीय संघ विजयासमीप पोहचू शकलं होता. पण धोनी बाद झाल्याने भारताचं विश्वविजेता होण्याचं स्वप्न दुभंगलं. 

पव्हेलियनमध्ये परतताना महेंद्रसिंह धोनी हा प्रचंड निराश झाल्याचं दिसलं. याआधी धोनीला कोणीही एवढं निराश झालेलं पाहिलं नव्हतं. किंबहुना त्याने याआधी कधीही एवढी निराशा आपल्या चेहऱ्यावर दाखवली नव्हती. अशावेळी जेव्हा विराट कोहली पत्रकार परिषदेला सामोरा गेला त्यावेळी त्याला असंही विचारण्यात आलं की, महेंद्र सिंह धोनीने आपल्या निवृत्तीबाबत टीम मॅनेजमेंट किंवा आपल्याशी काही चर्चा केली आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना विराट म्हणाला की, 'त्याने आमच्याशी याबाबत कोणतीही चर्चा केलेली नाही.' 

विश्वचषकाआधी अशीही चर्चा सुरु होती की, धोनी विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करु शकतो. पण सेमीफायनलमधील पराभवनंतर तसं काही झालं नाही. धोनी कधी, केव्हा आणि कसा निवृत्त होणार हे खुद्द धोनीच जाहीर करेल. कारण अद्याप तरी याबाबत कुणालाही फारशी माहिती नाही. त्यामुळे चाहत्यांनी अजिबात निराश न होता जोवर धोनी खेळतोय तोवर त्याच्या खेळाचा आनंद घ्यावा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
महेंद्रसिंह धोनी निवृत्ती घेणार? पाहा पराभवानंतर विराट कोहलीने काय दिलं उत्तर  Description: MS Dhoni Retirement: महेंद्रसिंह धोनी या विश्वचषकानंतर निवृत्त होणार असल्याची चर्चा सुरु होती. याचबाबत कर्णधार विराट कोहलीला प्रश्नही विचारण्यात आला होता. याबाबत कोहली नेमकं काय म्हणाला ते जाणून घ्या.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola