...म्हणून पंचाशी भांडला विराट कोहली, होऊ शकते शिक्षा

Virat Kohli argues with ground umpire Marais Erasmus after warning given to Mohammed Shami : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने केपटाऊनमध्ये मैदानावरील पंच मरायस इरासमस यांच्यात वाद घातला. कोहलीला पंचांसोबत मैदानावर भांडणे भोवण्याची शक्यता आहे. नियमानुसार दोषी आढळल्यास विराट कोहलीला शिक्षा होण्याची शक्यता आहे.

Virat Kohli argues with ground umpire
...म्हणून पंचाशी भांडला विराट कोहली, होऊ शकते शिक्षा 
थोडं पण कामाचं
  • ...म्हणून पंचाशी भांडला विराट कोहली, होऊ शकते शिक्षा
  • आक्रमकतेचा अतिरेक भोवण्याची शक्यता
  • तिसरा आणि निर्णायक कसोटी सामना; दुसऱ्या दिवसअखेर भारताने ७० धावांची आघाडी घेतली

Virat Kohli argues with ground umpire Marais Erasmus after warning given to Mohammed Shami : केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे तिसरा आणि निर्णायक कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताने ७० धावांची आघाडी घेतली आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकल्यामुळे केपटाऊनमध्ये सुरू असलेल्या सामन्याला महत्त्व आले आहे. या सामन्यात सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेणाऱ्या भारतीय संघाला आक्रमकतेचा अतिरेक भोवण्याची शक्यता वाढली आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने केपटाऊनमध्ये मैदानावरील पंच मरायस इरासमस यांच्यात वाद घातला. कोहलीला पंचांसोबत मैदानावर भांडणे भोवण्याची शक्यता आहे. नियमानुसार दोषी आढळल्यास विराट कोहलीला शिक्षा होण्याची शक्यता आहे.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात भारताची गोलंदाजी सुरू असताना पंच मरायस इरासमस यांनी गोलंदाज मोहम्मद शमी याला ताकीद दिली. खेळपट्टीच्या ज्या भागातून धावण्यास गोलंदाजाला परवानगी नाही त्याच भागात शमीचे पाऊल पडत असल्यामुळे त्याला पंच मरायस इरासमस यांनी ताकीद दिली. पण शमीला ताकीद दिल्याचे पाहून विराट कोहली संतापला. कोहलीला पंचांनी ताकीद देणे अयोग्य वाटले. शमी नियमाचे उल्लंघन करत नसल्याची ठाम भूमिका कोहलीने घेतली. या मुद्यावरुन विराट कोहली आणि पंच मरायस इरासमस यांच्यात भांडण झाले. मैदानात खेळ सुरू असतानाच वाद झाला. 

नंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या तसेच टीव्हीवर वारंवार दाखवलेल्या रिप्लेमध्ये शमीने चूक केल्याचे दिसले. पण त्याआधी कोहलीने पंचाशी मैदानात वाद घातला होता. नियमानुसार सामनाधिकारी या प्रकरणात कॅमेऱ्यांनी चित्रीत केलेली दृश्य बघतील तसेच मैदानावरील दोन्ही पंचांशी चर्चा करतील आणि त्यांचा निर्णय जाहीर करतील. दोषी आढळल्यास विराट कोहलीला शिक्षा होण्याची शक्यता आहे. या शिक्षेचे स्वरुप काय असेल हे सामनाधिकारी त्यांचा निर्णय जाहीर करतील तेव्हाच स्पष्ट होईल. 

याआधी केपटाऊनमध्ये सुरू असलेल्या निर्णायक कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या भारताने पहिल्या डावात सर्वबाद २२३ धावा केल्या. यात कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक ७९ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २१० धावांत आटोपला. यानंतर भारताने दुसऱ्या डावात दिवसअखेरपर्यंत २ बाद ५७ धावा केल्या. चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली हे दोघे मैदानात आहेत. दुसऱ्या दिवसअखेर भारताने ७० धावांची आघाडी घेतली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी