IND vs SA Test: कोहलीचा अंपायरशी वाद, बुमराहला सांगितली रणनीती आणि केली कमाल

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Dec 30, 2021 | 20:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

virat kohi: भारतीय संधाने द. आफ्रिकेविरुद्ध त्यांच्याच मैदानावर खेळवल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीत मजबूत पकड केली आहे. सामन्याच््याया चौथ्या दिवसाचा खेळ संपण्याआधी भारताचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या चाहत्यांना रणनीतीची कमाल दाखवली. 

virat kohli
IND vs SA Test: कोहलीचा अंपायरशी वाद, नंतर झाली कमाल 
थोडं पण कामाचं
  • भारत वि द. आफ्रिका सेंच्युरियन कसोटी
  • भारतीय संघाने ३०५ धावांचे लक्ष्य दिले

मुंबई: भारतीय संघाने द. आफ्रिकेविरुद्धच्या(india vs south africa) त्यांच्याच घरात खेळवल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीवर(test match) मजबूत पकड बनवली आहे. सामन्यात टीम इंडियाने द. आफ्रिकेला विजयासाठी ३०५ धावांचे आव्हान दिले आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत यजमान संघाने ४ विकेट गमावत ९४ धावा केल्या. या दरम्यान भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या रणनीतीची कमाल चाहत्यांना दाखवली. virat kohli arguing with umpire in test match against south africa

चौथ्या दिवसाचा खेळ संपण्याआधी अखेरची ओव्हर केली जाणार होती. तेव्हा पर्यंत ४० ओव्हरमध्ये द. आफ्रिकेने ३ विकेट गमावत ८८ धावा केल्या होत्या. ४१वा आणि अखेरच्या ओवर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने टाकली. या दरम्यान, कोहलीचा अंपायरशी वाद झाला. दोघेही काहीतरी बोलताना दिसत होते. कोहली रागात होता. शेवटच्या ओव्हरबाबत बोलणे सुरू होते. 

कोहलीने बुमराहला रणनीतीवर काम करण्यास सांगितले

तेव्हा कोहलीने वाद संपवला आणि बुमराहला सांगितले की इथूनच बॉल टाक, आऊट करूया याला. स्ट्राईकवर तेव्हा केशव महाराज खेळत होता. कर्णधार कोहलीने बुमराहसोबत मिळून महाराजला आऊट करण्याची योजना बनवली होती. कोहलीलायावर अंमल करायचा होता. मग काय होते बुमराहने रणनीतीनुसार काम केले. 

बुमराहने केशवला केले क्लीनबोल्ड

आपल्या ओव्हरमध्ये चौकार लागल्यानंतरही बुमराहने रणनीती सोडली नाही. ५व्या बॉलवर केशव महाराजला क्लीन बोल्ड केले. केशव बाद होण्यासोबतच दिवसाचा खेळ संपवण्यात आला. आता ५व्या दिवशी द. आफ्रिकेला विजयसाठी २११ धावांची गरज आहे. यजमान संघाकडे विजयासाठी ६ विकेट बाकी आहेत. टीम इंडियाला सामना जिंकण्यासाठी ६ विकेट मिळवणे गरजेच आहे. 

द. आफ्रिकेला त्यांच्याच घरात नाही हरवले

भारतीय संघाकडे आता द. आफ्रिकेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या मालिकेत १-०ने आघाडी घेण्याची संधी आहे. टीम इंडियाने आतापर्यंत द. आफ्रिकेविरुद्ध एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. भारताने आतापर्यंत द. आफ्रिकेविरुद्ध त्यांच्याच घरात ७ मालिका खेळल्या आहेत. यात एकदाही भारताला यश मिळालेले नाही. सहा वेळा यजमान संघाने बाजी मारली. तर २०१०मध्ये एक मालिका अनिर्णीत राहिली. २०१८मध्ये झालेल्या मालिकेत द. आफ्रिकेने पाहुण्या भारतीय संघाला २-१ने हरवले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी