corona: कोहलीचा बेस्ट फ्रेंड निघाला कोरोना पॉझिटिव्ह, आता संपूर्ण टीमचा होणार तपास

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 05, 2022 | 15:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

glenn mawell corona positive: बीबीएलमद्ये कोरोनाच्या केसेस सातत्याने येत आहेत. रेनेगाडेस टीममध्ये एक प्रकरण समोर आले आहे आणि तो पाचवा क्लब आहे ज्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणे समोर आली आहेत. 

virat kohli
corona: कोहलीचा बेस्ट फ्रेंड निघाला कोरोना पॉझिटिव्ह 
थोडं पण कामाचं
  • कोहलीचा बेस्ट फ्रेंड निघाला कोरोना पॉझिटिव्ह
  • आता संपूर्ण टीमचा होणार तपास
  • कोहलीसोबत आहे जुनी मैत्री

मुंबई:  विराट कोहली (Virat Kohli) ोबत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)सोबत IPLमध्ये खेळणारा त्याचा बेस्ट फ्रेंड ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) ला कोरोनाची लागण झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेल कोरोना पॉझिटिव्ह  (Covid 19) आढळला आहे. विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यात चांगली मैत्री आहे. virat kohli best friend found corona positive

कोहलीचा बेस्ट फ्रेंड कोरोना पॉझिटिव्ह

ग्लेन मॅक्सवेल येण्याने आरसीबीचा संघ आता बदललेला दिसत आहे. वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर ब्रायन लाराने आरसीबीमध्ये ग्लेन मॅक्सवेलला सामील करण्याचे श्रेय कर्णधार विराट कोहलीला दिले आहे. ब्रायन लाराने स्टार स्पोर्ट्सोबत बातचीत करताना म्हटले होते, ग्लेन मॅक्सवेल २०१९ आणि २०२०मध्ये खराब फॉर्मात होता. अ

से वाटतं होते की त्याचे आयपीएलमधील करिअर संपून जाईल. मला एका व्यक्तीचे नाव घ्यायचे आहे तो म्हणजे विराट कोहली. तुम्ही काय विार करता ग्लेन मॅक्सेलसाठी विराट कोहलीचा कॉल आला की ये आणि आरसीबीच्या संघात सामील हो आणि मला विश्वास आहे की त्यामुळेच त्याचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल. 

ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेलला कोरोना झाल्याची माहिती बुधवारी रॅपिड अँटीजन कसोटीत झाली. ऑस्ट्रेलियाच्या ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेलला २०२१मध्ये आरसीबीच्या संघात सामील केले होते. मात्र त्याच्यासारखा विस्फोटक फलंदाज संघात सामील झाल्याने संघ मजबूत झाला आहे. ग्लेन मॅक्सवेलने याआधी किंग्स इलेव्हन पंजाबचे कर्णधारपद सांभाळले आहे. ग्लेन मॅक्सवेल बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न स्टार्सचा कर्णधार आहे. मॅक्सवेलने या आयपीएलमध्ये या सीझनमध्ये १५ सामन्यांत १४४.१०च्या स्ट्राईक रेटने ५१३ धावा केल्या होत्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी