IND vs SA: विराट कोहलीच्या या निर्णयावर फॅन्सची नाराज, ट्विटरर्सवर  युजर्सने फटकारले...

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 05, 2019 | 19:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

कोहलीने वेगवान गोलंदाजीच्या आक्रमणाची जबाबदारी बुमराहसोबत भुवनेश्वर यांच्यावर सोपवली. विराट कोहलीच्या या निर्णयावर ट्विटर युजर्स नाराज होते. फॅन्सनुसार भुवनेश्वरच्या ऐवजी या क्रिकेटरला संधी द्यायला हवी होती.

virat kohli
विराट कोहली 

लंडन :  टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या एका निर्णयावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर युद्ध भडकले. टीम इंडियाने आज दक्षिण आफ्रिकेविरूद्ध वर्ल्ड कप २०१९ च्या अभियानाला सुरूवात केली. विराट कोहलीने वेगवान गोलांदाजीच्या आक्रमणाची जबाबदारी जसप्रित बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांच्या खांद्यावर टाकली. विराटच्या निर्णयावर ट्विटर युजर्स नाराज दिसले. फॅन्सच्या मते भुवनेश्वर ऐवजी मोहम्मद शमी याला संधी देणे गरजेचे होते. ज्याने नुकतेच मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली आहे. 
 
 शमी याने गेल्या ११ वन डे सामन्यांमध्ये २० विकेट पटकावल्या आहेत. तर भुवनेश्वर या वर्षी ११ सामन्यात १९ विकेट पटकावल्या आहेत. तसेच शमीचे आयपीएलमध्ये कामगिरी शानदार होती. तर भुवी आपल्या लाइन आणि लेन्थबाबत संघर्ष करताना दिसत होता. हे कारण होते की फॅन्सने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भुवनेश्वर ऐवजी मोहम्मद शमी याला खेळताना पाहू इच्छित होते.

 
 
 ट्विटर युजर्सने मोहम्मद शमीला प्लेइंग इलेवनमध्ये सामील नाही केल्याबद्दल भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहली याचा क्लास घेतला. एका युजरने विचारले की ईदच्या दिवशी शमीला का खेळवले नाही. चला पाहू या फॅन्सने मोहम्मद शमीला सामी न केल्याबद्दल कशा प्रकारे प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

 

 
 फॅन्सच्या प्रतिक्रिया जरी तिखट असल्या तरी, सामन्यात  सध्याची परिस्थिती पाहतात भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या संघावर पूर्णपणे आपली पकड बनवून आहे. या सामन्यात भुवनेशवरने अखेरच्या षटकांमध्ये २ विकेट मिळविण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे आता विराट कोहली पुढील सामन्यात फॅन्सचे ऐकतात की पुन्हा भुवनेश्वरला संधी देतो हे रविवारी ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात पाहावे लागणार आहे. 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी