virat kohli: विराट कोहली रचणार इतिहास, बांगलादेशविरुद्ध T20 वर्ल्ड कपमध्ये करणार हा महारेकॉर्ड!

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 02, 2022 | 12:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

Virat Kohli:बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या सामन्यात जर विराट कोहलीने 15 धावा केल्या तर तो टी20 वर्ल्ड कपमध्ये एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करणार. कोहली जबरदस्त फॉर्मात आहे.

kohli
कोहली रचणार इतिहास, बांगलादेशविरुद्ध करणार हा महारेकॉर्ड 
थोडं पण कामाचं
  • विराट कोहली टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.
  • आज टी20 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात 15 धावा केल्या तर तो टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल.
  • कोहलीच्या नावावर आज टी20 वर्ल्ड कपमध्ये 1001 धावा आहेत.

मुंबई: विराट कोहलीची(virat kohli) गणना जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये केली जाते. त्यांनी आपल्या जोरावर टीम इंडियाला(team india) अनेक सामने एकहाती जिंकून दिलेत. तो सध्या जबरदस्त फॉर्मात आहे आणि टी20 वर्ल्ड कपमध्ये(t-20 world cup) खूप धावा करत आहे. आशिया कप 2022(asia cup 2022) मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध शतक ठोकताच तो जुन्या जबरदस्त फॉर्मात परतला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात 2 नोव्हेंबरला सामना खेळवला जातोय. या सामन्यात विराट कोहली एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करू शकतो. जाणून घेऊया या बद्दल...virat kohli big record against bangladesh match

अधिक वाचा - वेळोवेळी नाक साफ करत नसाल तर होईल अल्झायमर

विराट कोहली बनवणार रेकॉर्ड

विराट कोहली टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. तर त्याने आज टी20 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात 15 धावा केल्या तर तो टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल. कोहलीच्या नावावर आज टी20 वर्ल्ड कपमध्ये 1001 धावा आहेत. महेला जयवर्धनेने टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक 1016 धावा केल्या आहेत. 

विस्फोटक फलंदाजीत माहीर 

विराट कोहली विस्फोटक फलंदाजीत माहीर आहे. तो  टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 112  टी20 सामन्यात 3868 धावा केल्या आहेत. यात एका शतकाचाही समावेश आहे. त्याच्या धावांच्या ताफ्यात अनेक असे शॉट आहेत ज्याने प्रतिस्पर्धी संघाला तो धारातीर्थी पाडूशकतो. जेव्हा तो फॉर्मात असतो तेव्हा गोलंदाजी आक्रमणाच्या चिंधड्या उडवतो. 

शानदार फॉर्मात आहे कोहली

विराट कोहलीने भारतासाठी तीनही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक 100 सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 71 शतके आहेत. तो लक्ष्याचा पाठलाग करताना जबरदस्त फलंदाजी करतो. त्याने सध्याच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध आणि नेदरलँड्सविरुद्ध जबरदस्त खेळी केल्या आहेत. 

टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज 

1. महेला जयवर्धने (श्रीलंका) - 1016 रन
2. विराट कोहली (भारत) - 1001 रन
3. क्रिस गेल (वेस्टइंडीज) - 965 रन

अधिक वाचा - इतक्या आजारांसाठी गुणकारी आहे मेथी, जाणून घ्या त्याचे फायदे

पाकिस्तानविरुद्ध मॅचविनिंग खेळी

विराट कोहलीने सध्याच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात जबरदस्त मॅचविनिंग खेळी केली. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात नाबाद 82 धावांची खेळी करत भारताला अशक्यप्राय विजय मिळवून दिला. या खेळीने त्याने दाखवून दिले की तो किंग कोहली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी