Virat Kohli: कोहलीने सिडनीमध्ये तोडला सचिन तेंडुलकरचा मोठा रेकॉर्ड

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 28, 2022 | 11:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

IND vs NED:टीम इंडियाचा स्टार विराट कोहलीने सिडनी क्रिकेट ग्राऊंडमध्ये दमदार कामगिरी केली आणि नेदरलँड्सविरुदध टी20वर्ल्डकपधील सामन्यात नाबाद 62 धावांची खेळी केली. या दरम्यान त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडला.

virat kohli
कोहलीने सिडनीमध्ये तोडला सचिन तेंडुलकरचा मोठा रेकॉर्ड 
थोडं पण कामाचं
  • स्टार भारतीय फलंदाज विराट कोहलीने गुरूवारी नेदरलँड्सविरुद्ध 44 बॉलमध्ये 62 धावांची नाबाद खेळी केली.
  • या दरम्यान त्याने SENA  देशांमध्ये सर्वाधिक अर्धशतके ठोकण्याचा महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडला आहे.
  • विराटचे या 4 देशांमध्ये एकूण 49 अर्धशतके आहेत.

मुंबई: जगातील अव्वल फलंदाजांपैकी एक विराट कोहलीने(virat kohli) आणखी एक मोठा रेकॉर्ड(big record) आपल्या नावे केला आहे. विराटने एका बाबतीत महान फलंदाज सचिन तेंडुलकरला(sachin tendulkar) मागे टाकले आहे. ही कमाल त्याने नेदरलँड्सविरुद्ध टी20 वर्ल्डमधील सामन्यात आपल्या अर्धशतकीय खेळी केली. भारताने सिडनीत खेळवल्या गेलेल्या सामन्यात नेदरलँड्सला 56 धावांनी हरवले आणि आपल्या ग्रुपला टॉपवर पोहोचवले. virat kohli break sachin tendulkar record

अधिक वाचा - सुनेला घराची कामे सांगणे म्हणजे क्रूरता नाही - कोर्ट

SENA देशांमध्ये सर्वाधिक अर्धशतक

स्टार भारतीय फलंदाज विराट कोहलीने गुरूवारी नेदरलँड्सविरुद्ध 44 बॉलमध्ये 62 धावांची नाबाद खेळी केली. या दरम्यान त्याने SENA (दक्षिण अफ्रीका, इंग्लंड, न्यूजीलंड, ऑस्ट्रेलिया)  देशांमध्ये सर्वाधिक अर्धशतके ठोकण्याचा महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडला आहे. विराटचे या 4 देशांमध्ये एकूण 49 अर्धशतके आहेत. त्याच्या नावावर ऑस्ट्रेलियामध्ये 17, इंग्लंडमध्ये 8, न्यूझीलंडमध्ये पाच आणि दक्षिण अफ्रीकेत 9 अर्धशतके झाली आहेत. दुसरीकडे ऑस्ट्रेलियामध्ये 17, इंग्लंडमध्ये 12, न्यूझीलंडमध्ये10 आणि दक्षिण अफ्रीकेत एकूण 9 अर्धशतके ठोकली आहे. 

ऑस्ट्रेलिया दोघांचेही दमदार कामगिरी

क्रिकेटच्या दृष्टीने SENA देशांमध्ये चांगली कामगिरी करणे सर्व करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. या देशांतील पिच वेगवान आणि उसळणाऱ्या विकेटसाठी ओळखली जाते. ऐतिहासिक रूपानेया देशांमध्ये भारताची कामगिरी जगातील इतर भागांच्या तुलनेत कमकुवत राहिली आहे मात्र विराट आणि सचिनने आपल्या पूर्ण करिअरमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. 

अधिक वाचा - महानगरपालिकांच्या निवडणुका कधी? समोर आली मोठी अपडेट

नेदरलँड्सविरुद्ध मिळवून दिला विजय

33 वर्षीय विराट कोहलीने सिडनी क्रिकेट ग्राऊंडमध्ये जबरदस्त कामगिरी केली आणि नेदलँड्सविरुद्ध टी20 वर्ल्डकपमधील सामन्यात नाबाद 62 धावांची खेळी केली. विराटने 44 बॉलमध्ये तीन चौकार आणि दोन षटकार ठोकले. विराटशिवाय कर्णधार रोहित शर्माने 53 आणि सूर्यकुमार यादवने नाबाद 51 धावांचे योगदान दिले. भारताने 2 विकेटवर 179 धावा केल्या यानंतर नेदरलँड्सच्या संघाला 9 विकेटवर 123 धावा केल्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी