Virat Kohli Record : भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार विराट कोहलीने आज दक्षिण आफ्रिकेविरोधात दमदार कामगिरी बजावली आहे. कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर विराट आज पहिल्यांदाच मैदानात उतरला आणि सर्व चाहत्यांच्या त्याच्याकडे लक्ष होते. आता शिखर धवनच्या साथीने विराट कोहलीने विक्रम केला आहे.
FIFTY! — BCCI (@BCCI) January 19, 2022
A well-made half century for @imVkohli off 60 deliveries.
His 63rd in ODIs.
Live - https://t.co/PJ4gV8SFQb #SAvIND pic.twitter.com/jqym5a8saV
भारत आणि दक्षिण आफ्रिक्रेदरम्यान भारतला २९८ धावांचे लक्ष्य मिळाले होते. के एल राहुल या सामन्यात कर्णधार होता, राहुलने अवघ्या १२ धावा काढून आऊट झाला. नंतर विराट आणि शिखर धवनने मैदान सांभाळले. तेव्हा १४ व्या ओवरमध्ये ११ वा रन काढून विराटने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला.
विराट कोहली भारतीय वनडे क्रिकेटच्या इतिहासात परदेशात वनडे सामन्यांत सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीने महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे. सचिन तेंडुलकरने परदेशातल्या मैदानावर ५ हजार ६५ धावा काढओया होत्या. विराटने यापूर्वी सचिन तेंडुलकरचे अनेक छोटे मोठे विक्रम मोडले आहेत, परंतु हा विक्रम खास आहे.
सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत सर्वाधिक ४६३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये सचिनने १८ हजार ४२६ धावा काढल्या आहेत. आपल्या एकदिवसीय सामन्यांच्या कारकीर्दीत सचिनने ४९ शतकं केली आहेत. विराटने आतापर्यंत १२ हजार धावा काढल्या आहेत, विराट सध्या दुसर्या क्रमांकावर असून त्याने ४३ शतकं केली आहेत.