IND vs SA: तिसऱ्या कसोटीत या खेळाडूला संधी देणार Virat Kohli?

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 10, 2022 | 14:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs South Africa: भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील तिसरा सामना केपटाऊनमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यात कर्णधार विराट कोहली खेळणार आहे. कोहली प्लेईंग इलेव्हनमध्ये एका जबरदस्त खेळाडूला सामील करू शकतो. हा खेळाडू आपल्या जीवावर सामना पलटवू शकतो.

team india
IND vs SA:या खेळाडूला संधी देणार Virat Kohli 
थोडं पण कामाचं
  • केपटाऊनमध्ये रंगणार तिसरा सामना
  • या खेळाडूला मिळू शकते संधी
  • मालिकेत १-१ अशी बरोबरी

मुंबई: भारत आणि द. आफ्रिका(india vs south africa test series) यांच्यात तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना केपटाऊनमध्ये खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ मालिकेत १-१ अशा बरोबरीत आहेत. त्यामुळे तिसरा सामना निर्णायक असणार आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली(virat kohli) जिंकण्यासाठी कोणतीच कसर मागे सोडणार नाही. संघात काही मॅच विनर खेळाडू आहेत. मात्र एका असा खेळाडू आहे ज्यान शतक ठोकल्यानंतरही त्याला बाहेर बसवण्यात आले आहे. कोहली या खेळाडूला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देऊ शकतो. virat kohli can give chance to this player in third test match against south africa

या खेळाडूला मिळणार संधी

भारतीय संघ खराब फलंदाजीमुळे दुसरा कसोटी सामना हरली. तिसऱ्या सामन्यात स्टार फलंदाज आणि कर्णधार विराट कोहली परतणार आहे. अशातच तो प्लेईंग ११ निवडण्यात कोणतीही चूक करणार नाही. तो एका जबरदस्त खेळाडूला संधी देऊ शकतो.आम्ही बोलत आहोत श्रेयस अय्यरबाबत. अय्यरला द. आफ्रिकेविरुद्ध्या गेल्या दोन कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. अय्यर नेहमीच मोठी खेळी करण्यासाठी ओळखला जातो. 

न्यूझीलंडविरुद्ध केली होती कमाल

श्रेयसने न्यूझीलंडविरुद्ध आपले कसोटी पदार्पण केले होते. आल्ा पहिल्या कसोटी सामन्यात अय्यरने शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक ठोकले होते. त्याच्या फलंदाजीचे अनेक चाहते झालेत. लाल बॉलच्या क्रिकेटमध्ये अय्यर मोठी कमाल करू  शकतो. त्याच्याजवळ विकेटवर टिकून राहण्याची क्षमता आहे. अय्यर जर फॉर्मात असला तर समोरच्या गोलंदाजांच्या तो चिंधड्या उडवतो. 

या खेळाडूंना करणार रिप्लेस?दुसऱ्या कसोटीत भारतीय सलामीवीर मोठी खेळू करू शकले नव्हते त्यामुळे मधल्या फळीवर दबाव आला आणि मधली फळी पूर्णपणे कोसळली. अजिंक्य रहाणेने अर्धशतक ठोकले. मात्र ती खेळी सामना जिंकण्यासाठी पुरेशी ठरली नाही. अजिंक्यवर धीम्या वेगाने फलंदाजी केल्याने टीकाही झाली.

अशातच श्रेयस अय्यर मधल्या फळीत मजबूती देऊ शकतो. क्रिकेटच्या मोठ्या फॉरमॅटमध्ये खेळण्यासाठीचे सगळे गुण अय्यरमध्ये आहेत. 

मालिकेत १-१ अशी बरोबरी

भारताला दुसऱ्या कसोटी सामन्यात ७ विकेटनी पराभव सहन करावा लागला. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीत आहेत. भारताने पहिला कसोटी सामना जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेचा विजय झाला. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी