Virat Kohli: वर्ष संपले, खेळ संपला! Virat Kohli पुन्हा अपयशी

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Dec 29, 2021 | 18:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

Virat Kohli, Ind Vs Sa: कर्णधार विराट कोहली द. आफ्रिकेविरुद्ध खेळवल्या जात असलेल्या सेंच्युरियन कसोटीच्या दोनही डावांमध्ये अपयशी ठरला. २०२१ हे वर्ष विराट कोहलीसाठी चांगले गेले नाही. या वर्षी एकही शतक त्याच्या बॅटमधून निघालेले नाही. 

virat kohli
Virat Kohli: वर्ष संपले, खेळ संपला! Virat Kohli पुन्हा अपयशी 
थोडं पण कामाचं
  • सेंच्युरियन कसोटीच्या दोनही डावांमध्ये विराट कोहली अपयशी
  • ७१व्या शतकासाठी आता २०२२मध्ये असेल आशा

मुंबई: सध्याच्या घडीचा सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक विराट कोहलीसाठी(virat kohli)२०२१ हे वर्ष चांगले गेले नाही. द. आफ्रिकेविरद्धच्या(south africa) सेंच्युरियन(centurion) कसोटीतील दोनही डावांमध्ये विराट कोहली अपयशी ठरला. पहिल्या डावात त्याने ३५ धावा केल्या तर दुसऱ्या डावात त्याने केवळ १८ धावा केल्या. यासोबतच ७१व्या शतकासाठी जी प्रतीक्षा २०१९पासून सुरू होती ती आणखी वाढली आहे. Virat kohli cant make century in year 2021 

विराट कोहलीचा द. आफ्रिकेतील रेकॉर्ड चांगला आहे. अशातच चाहत्यांना आशा हती २०१९ पासून जे शतक ठोकलेले नाही ते वर्षाअखेरीस पूर्ण होईल. दरम्यान, आता या दौऱ्याची सुरूवात झाली आहे मात्र २०२१ मध्ये तर आता शतक होणे शक्य नाही. सेंच्युरियन कसोटीच्या पहिल्या डावात विराट कोहली चांगल्या लयीत दिसत होता मात्र बाहेर जाणाऱ्या बॉलला स्पर्श केला आणि आपली विकेट दिली. दुसऱ्या डावातही हेच घडले. विरा कोहली हलका शॉट खेळण्याच्या नादात बाद झाला. विराट कोहलीकडून या शॉटची अपेक्षा नव्हती. 

पूर्ण वर्षात १००० धावाही नाहीत...

विराट कोहलीसाठी २०२१ हे वर्ष इतके वाईट गेले की तीनही फॉरमॅटमध्ये मिळून त्याला एक हजारही धावा वर्षभरात करता आल्या नाहीत. कसोटी, वनडे आणि टी-२० मिळून यावर्षी तो २४ सामने खेळला. यातील ३० डावांमध्ये त्याने ९६४ धावा केल्या. या दरम्यान विराट कोहलीची सरासरी ३७.०७ इतकी होती. ही त्याच्या करिअरच्या सरासरीपेक्षा कम आहे. 

जर कसोटीबाबत बोलायचे झाल्यास विराट कोहलीने या वर्षात ११ कसोटी सामने खेळले. यात त्याने ५३६ धाव केल्या. विराट कोहलीची कसोटीतील सरासरी २८.२१ इतकी आहे. इंग्लंड दौरा असो वा ऑस्ट्रेलियातील एकमेव सामना अथवा वेगळी मालिका. सगळीकडे विराट कोहलीची बॅट फ्लॉप राहिली. 

कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीने शेवटचे शतक बांगलादेशविरुद्ध २०१९मध्ये ठोकले होते. तर वनडेत ऑगस्ट २०१९मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचे शतक ठोकले होते. विराट कोहलीच्या नावावर आतापर्यंत ७० शतके आहेत. मात्र ७१व्या शतकासाठीची प्रतीक्षा दोन वर्षे सुरू आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी