Happy Birthday Virat Kohli: रेकॉर्ड आणि रन मशीन आज 31 वर्षांचा झाला 

Virat Kohli 31st birthday: टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आज आपला 31 वा बर्थडे साजरा करत आहे. त्याच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

Virat Kohli
Happy Birthday Virat Kohli: रेकॉर्ड आणि रन मशीन आज 31 वर्षांचा झाला   |  फोटो सौजन्य: IANS

थोडं पण कामाचं

  • टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
  • विराट कोहली आज आपला 31 वा बर्थडे साजरा करत आहे.
  • भारतीय क्रिकेटचा पोस्टर बॉय सतत फॅन्सचं भरपूर मनोरंजन करत आहे.

Virat Kohli celebrates his 31st birthday today - November 05, 2019: टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. विराट कोहली आज आपला 31 वा बर्थडे साजरा करत आहे. भारतीय क्रिकेटचा पोस्टर बॉय सतत फॅन्सचं भरपूर मनोरंजन करत आहे. तसंच एकापाठोपाठ एक बॅटिंगचे रेकॉर्ड्स मोडण्याचा विक्रम स्थापित करत आहे. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली जेव्हा मैदानावर खेळण्यासाठी उतरतो तेव्हा रेकॉर्ड त्याच्या निशाण्यावरच असतो. 

विराट कोहलीला केवळ टीम इंडियाची रन मशीन नाही तर रेकॉर्ड मशीन देखील म्हटलं जातं. वर्ल्ड क्रिकेटमध्ये सर्वांत वेगानं 10 हजार वनडे रन बनवणारा कोहली क्रिकेटप्रमाणे आपल्या पर्सनल लाइफमध्ये ही रॉकस्टार आहे. कोहलीला जेव्हा ही ब्रेक मिळतो तेव्हा तो आपल्या कुटुंबियासोबत वेळ घालवणं पसंत करतो. भारत आणि बांग्लादेश यांच्यात सध्या तीन सामन्याची T20 आंतरराष्ट्रीय सामन्याची सीरिज खेळली जात आहे. ज्यातून कोहलीनं ब्रेक घेतला आहे. माहिती मिळाली आहे की, कॅप्टन कोहली आपली पत्नी बॉलिवूड अॅक्ट्रेस अनुष्का शर्मासोबत सध्या भूतानमध्ये आहे आणि तिथे तो आपला बर्थडे सेलिब्रेट करत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#WaybackWednesday

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

virat kohli

विराट कोहली एक आदर्श क्रिकेटर होण्यासोबतच एक चांगला पती सुद्धा आहे. काही दिवसांपूर्वीच करवा चौथचा उपवास आपल्या पत्नीसोबत त्यानं ठेवला होता. याची माहिती विराटनं सोशल मीडिया अकाऊंट्सवरून दिली होती. तेव्हा त्यानं आपल्या पत्नीसोबत फोटो देखील शेअर केला होता.  विराटनं फिटनेसच्या बाबतीतही एक स्तर स्थापित केला आहे. त्याला प्रत्येकजण फॉलो करते.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

The ones who fast together laugh together . Happy karvachauth

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

विराट कोहलीनं आतापर्यंत 82 टेस्टमध्ये 26 शतक आणि 22 अर्धशतकांच्या मदतीनं 7066 रन केले. याच दरम्यान त्याचा सरासरी 54.77 ची होती तर स्ट्राइक रेट 57.62 चा होता. टेस्टमध्ये कोहलीचा सर्वश्रेष्ठ स्कोर नाबाद 254 रन आहे. टीम इंडियाच्या कॅप्टननं 239 वनडेमध्ये 43 शतक आणि 54 अर्धशतकांच्या मदतीनं 11520 रन केले. त्याचा सर्वश्रेष्ठ स्कोर 183 रन आहे. T20 आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये कोहलीनं 72 सामने खेळला आणि 22 अर्धशतकांच्या मदतीनं 2450 रन केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी