Virat Kohli Instagram : विराट कोहली इंस्टाग्रामवर एका पोस्टसाठी घेतो इतके कोटी; कमाईत हा खेळाडू नंबर वन

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 09, 2022 | 19:31 IST | टाइम्स नाऊ मराठी

Virat Kohli | भारतीय संघाचा महान खेळाडू विराट कोहली केवळ त्याच्या फलंदाजीने इतर खेळाडूंनाही मागे सोडत नाही तर त्याहीपेक्षा इतरही अनेक सामने आहेत ज्यात विराट कोहली खेळाडूंना मागे टाकताना पाहायला मिळत आहे. यामध्येच आता आणखी एका किताबाचा समावेश झाला आहे. ते म्हणजे इंस्टाग्रामवरील फॉलोअर्स आणि त्यांच्या पोस्टवर घेतलेले पैसे.

 Virat Kohli charges more than Rs 5 crore for a single post on Instagram while Cristiano Ronaldo is number one in the world in terms of social media earnings
विराट कोहली इंस्टाग्रामवर एका पोस्टसाठी घेतो इतके कोटी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भारतीय खेळाडू विराट कोहलीला इंस्टाग्राम सोशल मीडिया ॲपवर भारतात १७७ लाख लोक फॉलो करतात.
  • जगातील सर्वाधिक लोक सोशल मीडियावर फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोला फॉलो करतात. इंस्टाग्रामवर क्रिस्टियानो रोनाल्डोला एकूण ३८८ मिलियन लोक फॉलो करतात.
  • विराट कोहलीला इंस्टाग्राम प्रमोशनसाठी $६८०००० म्हणजेच ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळते.

Virat Kohli | नवी दिल्ली : भारतीय संघाचा महान खेळाडू विराट कोहली केवळ त्याच्या फलंदाजीने इतर खेळाडूंनाही मागे सोडत नाही तर त्याहीपेक्षा इतरही अनेक सामने आहेत ज्यात विराट कोहली खेळाडूंना मागे टाकताना पाहायला मिळत आहे. यामध्येच आता आणखी एका किताबाचा समावेश झाला आहे. ते म्हणजे इंस्टाग्रामवरील फॉलोअर्स आणि त्यांच्या पोस्टवर घेतलेले पैसे. भारतीय खेळाडू विराट कोहलीला इंस्टाग्राम सोशल मीडिया अॅपवर भारतात १७७ लाख लोक फॉलो करतात. २०२१ च्या हॉपर इंस्टाग्रामच्या सर्वोच्च मानधनाच्या यादी मधील सर्वोच्च क्रमवारीनुसार भारतात फॉलो केले जाणारा विराट नंबर वन भारतीय आहे. या बाबतीत ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्रा दुसऱ्या स्थानावर आहे. किंग कोहली जगात १९ व्या स्थानावर आहे. जगातील सर्वाधिक लोक सोशल मीडियावर फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोला फॉलो करतात. इंस्टाग्रामवर क्रिस्टियानो रोनाल्डोला (Cristiano Ronaldo) एकूण ३८८ मिलियन लोक फॉलो करतात. (Virat Kohli charges more than Rs 5 crore for a single post on Instagram while Cristiano Ronaldo is number one in the world in terms of social media earnings). 

एका प्रमोशनल पोस्टसाठी इतके कोटी रूपये घेतो विराट

क्रिकेटशिवाय भारतीय खेळाडू विराट कोहली इतर अनेक जाहिराती, प्रमोशन आणि इतर माध्यमातून आपली कमाई करतो. ज्यामध्ये इंन्स्टाग्रामवरील पोस्ट हे देखील एक मोठे माध्यम आहे. विराट कोहलीला इंस्टाग्राम प्रमोशनसाठी $६८०००० म्हणजेच ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळते. सर्वाधिक फॉलोअर्सच्या यादीत जगातील नंबर वन फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो $१६०४०० एवढी रक्कम घेतो.

दरम्यान, लक्षणीय बाब म्हणजे विराट कोहली ब्रँड व्हॅल्यूमध्येही आघाडीवर असल्याचे पाहायला मिळते. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार भारतीय खेळाडू विराट कोहलीची ब्रँड व्हॅल्यू अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, आलिया भट्ट यांसारख्या बॉलिवूड कलाकारांपेक्षा जास्त आहे. विराट कोहलीची भारतात सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू आहे. कोहली २३७.७ कोटींसह आघाडीवर आहे. कोहली ऑडी, विक्स आणि टू यम सारख्या कंपन्यांचा ब्रँड अॅम्बेसेडर देखील आहे. अशाप्रकारे विराट कोहली जाहिरातीतही सर्व सेलिब्रिटींच्या पुढे आहे. किंग कोहली मैदानावर आणि मैदानाबाहेर सर्वत्र किंग आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी