Virat Kohli: कोहलीचा खुलासा - करायचे होते वनडेचे नेतृत्व मात्र....

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Dec 15, 2021 | 14:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

Virat Kohli Press Conference: वनडेच्या कर्णधारपदावरून हटवल्ानंतर विराट कोहली पहिल्यांदा प्रेस कॉन्फरन्समद्ये बोलला आहे. उद्या म्हणजेच १६ डिसेंबरला भारतीय संघ द. आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होत आहे. येथे टीम इंडिया ३ कसोटी आणि ३ वनडे सामने खेळणार आहे

virat kohli
विराट कोहली 
थोडं पण कामाचं
  • १६ डिसेंबरला रवाना होणार टीम इंडिया
  • दौऱ्यात ३ कसोटी आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळ
  • दौऱ्याआधी विराट कोहलीकडून काढून घेतले वनडे नेतृत्व

मुंबई: टीम इंडियाच्या वनडे संघाचे नेतृत्व काढून घेतल्यानंतर कसोटी कर्णधार विराट कोहली पहिल्यांदा प्रेस कॉन्फरन्स घेत आहे. उद्या म्हणजेच १६ डिसेंबरला टीम इंडिया द. आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होत आहे. येथे टीम इंडिया ३ कसोटी आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. विराट कोहलीने स्पष्ट केले आहे की तो द. आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेत खेळणार आहे. तसेच बीसीसीआयकडे त्याने आरामाची मागणीही केली नसल्याचे यावेळी त्याने स्पष्ट केले.  virat kohli clarifies about rift between rohit sharma

एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध असेल, बीसीसीआयला विश्रांती देण्याची विनंती करण्यात आलेली नाही

एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात आल्यानंतर विराट कोहलीने वनडे मालिकेसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले आहे. विराटने त्या सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम देत बीसीसीआयला ही विश्रांती देण्याची विनंती केली नसल्याचे सांगितले. विराट पुढे म्हणाला की, कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर होण्याच्या एक तास आधी त्याच्याशी संपर्क साधण्यात आला होता.

वनडे कर्णधारपदावरून हटवण्यापूर्वी नाही दिली माहिती 

विराट म्हणाला, कसोटी संघाची घोषणा होण्याच्या दीड तास आधी माझ्याशी संपर्क करण्यात आला. मुख्य निवडकर्त्याने माझ्याशी कसोटी संघाबाबत चर्चा केली. पण कॉल संपण्यापूर्वी निवडकर्त्यांनी मला सांगितले की, तो यापुढे एकदिवसीय संघाचा कर्णधार राहणार नाही, मला त्यात काही अडचण नाही. मात्र या निर्णयापूर्वी माझ्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही.

टी-20 कर्णधारपद सोडू नका असे कोणीही म्हटले नाही

विराट पुढे म्हणाला, मी बीसीसीआयला सांगितले होते की, मी कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार असेल. पण जर बीसीसीआयला मी एकदिवसीय संघाचे नेतृत्व करू नये असे वाटत असेल तर माझी हरकत नाही. मी टी-20 संघाचे कर्णधारपद सोडले तेव्हा मी बीसीसीआयला स्पष्टपणे सांगितले होते की मला काय करायचे आहे. विराट पुढे म्हणाला, टी-20 कर्णधारपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयावर, बोर्डातील कोणीही मला या निर्णयावर विचार करण्यास सांगितले नाही.

रोहितसोबत कोणताही वाद नाही

रोहित शर्मासोबतच्या वादाच्या बातम्यांवर विराट म्हणाला की, रोहितसोबत माझा कोणताही वाद नाही. इंग्लंड दौऱ्यात रोहितच्या कसोटी संघाची उणीव भासणार आहे. हे मी गेली दोन वर्षे सांगत आहे. मी माझ्या कोणत्याही कृतीने किंवा विधानाने संघाचे नुकसान करू इच्छित नाही. मी भारतीय क्रिकेट संघासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी