virat kohli:भारताविरुद्ध विस्फोटक खेळी करणाऱ्या लिटन दासला विराटने दिले महागडे गिफ्ट

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 04, 2022 | 14:18 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs Bangladesh, T20 World Cup 2022: बांगलादेशचा सलामीवर लिटन दासनेभारताविरुद्ध अॅडलेडमध्ये जबरदस्त खेळी करताना केवळ 27 बॉलमध्ये 60 धावा ठोकल्या होत्या. सामन्यानंतर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने लिटन दासला एक स्पेशल गिफ्ट दिले. 

litton das
भारताविरुद्ध खेळी करणाऱ्या लिटन दासला विराटकडून महागडे गिफ्ट 
थोडं पण कामाचं
  • लिटन दासने भारताविरुद्ध 27 बॉलमध्ये 60 धावा ठोकल्या
  • केएल राहुलच्या सरळ थ्रोवर लिटन दास बाद होत डगआऊटमध्ये परतला
  • भारताने बांगलादेशला डकवर्थ लुईस नियमानुसार 5 धावांनी हरवले

अॅडलेड: भारतीय संघाचा(India Cricket team) माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli)बुधवारी बांगलादेश(Bangladesh Cricket team) विरुद्धच्या सामन्यानंतर लिटन दासला (Litton Das)ला आपली बॅट गिफ्ट म्हणून दिली. भारत आणि बांगलादेश यांच्यात बुधवारी अॅडलेडमध्ये टी20 वर्ल्‍ड कप (T20 World Cup)चा सुपर 12 राऊंडमधील सामना खेळवण्यात आला. येथे मेन इन ब्लने डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेशवर 5 धावांनी विजय मिळवला. virat kohli gives special gift to Litton das after match against india

अधिक वाचा - पिवळे दात चमकवण्यासाठी 'या' फळाच्या सालींचा उपयोग करा

बांगलादेशचा संघ 185 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उरली. यावेळेस लिटन दासने संघाला वेगवान सुरूवात करून दिले. त्याने केवळ 21 बॉलमध्ये अर्धशतक ठोकले. जेव्हा पावसामुळे खेळ थांबला तेव्हा बांगलादेशचा संघ 7 ओव्हरमध्ये गरजेपेक्षा जास्त  17 धावांनी पुढे होता. लिटन दासने 27 बॉलमध्ये  60 धावा केल्या आणि त्यानंतर लोकेश राहुलच्या जबरदस्त थ्रोवर आपली विकेट गमावली. भारतासाठी नाबाद 64 धावांची खेळी करणाऱ्या विराट कोहलीने सामन्यानंतर आपली बॅट गिफ्ट केली. 

बांगलादेश क्रिकेट बोर्डायेच क्रिकेट ऑपरेशन्सचे चेअरमन जलाल युनूस यांनी यास दुजोरा दिला. जलाल युनुस यांच्या हवाल्याने बीडीक्रिकटाईम बांग्लाने ही बातमी दिली. जेव्हा आम्ही डायनिंग हॉलमध्ये बसलो होतो तेव्हा विराट कोहली आला आणि त्याने आपली बॅट लिटन दासला गिफ्ट केली. माझ्या मते लिटन दाससाठी हा क्षण प्रेरणादायी होता. लिटन दास क्लास फलंदाज आहे. आम्ही त्याचे क्लासिकल शॉट पाहिले आहेत. तो कसोटी आणि वनडेतील शानदार खेळाडू आहे. नुकतेच त्याने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली आहे. 

सामन्याबाबत बोलायचे झाल्यास भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावताना 184 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशच्या संघाने नियमित अंतराने विकेट गमावल्या आणि त्यांना 16 ओव्हरमध्ये 6 बाद 145 धावा केल्या. भारतीय संघाने या विजयासह सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा प्रबळ केल्या आहेत. भारताने रविवारी झिम्बाब्वेला मात दिली तर ते ग्रुपमध्ये टॉप राहताना सेमीफायनलमध्ये पोहोचतील. 

अधिक वाचा - बाईंचा डान्स पाहून गुरुजींनाही घातला येईना आवर

कोहलीचा मोठा रेकॉर्ड

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने जबरदस्त रेकॉर्ड केला. कोहलीने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात नाबाद 64 धावा ठोकल्या. विराट कोहली टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धााव करणाऱ्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे. त्याने महेला जयवर्धनेला मागे टाकले. महेला जयवर्धनेने टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक 1016 धावा केल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी