Virat Kohli: कोहलीच्या रूमचा व्हिडिओ झाला leak, व्हिडिओ पाहून भडकला विराट

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 31, 2022 | 12:04 IST | टाइम्स नाऊ मराठी

Virat Kohli Room: भारतीय संघ टी20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियामध्ये आहे. यातच माजी कर्णधार विराट कोहलीच्या रूमचा व्हिडिओ लीक झाला आहे. हे पर्थच्या हॉटेलमधील व्हिडिओ आहे. 

virat kohli
कोहलीच्या रूमचा व्हिडिओ झाला लीक, व्हिडिओ पाहून भडकला विराट 
थोडं पण कामाचं
  • भारताचा सुपरस्टार फलंदाज विराट कोहलीने सोमवारी एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
  • त्याच्या रूममधील सर्व गोष्टी दिसत आहेत.
  • व्हिडिओ विराटच्या टेबलापासून सुरू होतो यावर लक्ष्मी-गणेशाची मूर्ती सफेद कपड्यावर दिसत आहे.

मुंबई; भारतीय संघ सध्या टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup-2022) साठी ऑस्ट्रेलियात(australia) आहे. यातच टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि धुरंधर फलंदाजांपकी एक विराट कोहलीच्या(virat kohli) रूमचा व्हिडिओ लीक झाला आहे. सोशल मीडियावर(social media) व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये त्याच्या रूममधील सर्व गोष्टी दिसत आहे. दरम्यान, हा व्हिडिओ लीक झाल्याबाबत कोहली खूप भडकला आहे. त्याच्या पोस्टवर अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी हे खाजगीकरणाचे हनन असल्याचे म्हटले आहे. virat kohli got angry after video leak on social media

अधिक वाचा - घरात हनुमानाचा फोटो 'या' दिशाला लावल्यानं होईल फायदा

विराटने शेअर केला व्हिडिओ

भारताचा सुपरस्टार फलंदाज विराट कोहलीने सोमवारी एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्याच्या रूममधील सर्व गोष्टी दिसत आहेत. व्हिडिओ विराटच्या टेबलापासून सुरू होतो यावर लक्ष्मी-गणेशाची मूर्ती सफेद कपड्यावर दिसत आहे. त्यावर कॅप, चष्मा आणि घड्याळांचे बॉक्स यात दिसत आहे. त्यानंतर त्याचे शूज दिसतात. जर्सीचे अनेक सेट या व्हिडिओत दिसत आे. याशिवाय अनेक प्रकारच्या क्रीम त्याच्या ड्रेसिंग रूममध्ये दिसत आहे.

भडकला विराट

विराट कोहलीने व्हिडिओ शेअर करताना खूप राग व्यक्त केला आहे. त्याने लिहिले, मला मान्य आहे की चाहते आपल्या आवडत्या खेळाडूला पाहून खुश होतात. त्यांना भेटण्यास मलाही उत्साह असतो. मी नेहमी त्याच्याबाजूने आहे मात्र हा व्हिडिओ भयानक आहे. या व्हिडिओमुळे माझ्या प्रायव्हसीला तडा गेला आहे. जर माझ्या हॉटेल रूममध्ये जर मला प्रायव्हसी मिळत नसेल तर माझ्या पर्सनल स्पेसबाबत मी काय अपेक्षा करू शकतो. लोकांच्या प्रायव्हसीचा आदर करावा आणि त्यांना मनोरंजनाची वस्तू समजू नका. 

अधिक वाचा - 3 दिवसात 2 ग्रह बदलतील या राशी! 4 राशीच्या लोकांची होईल मजा

नाराज झाले वॉर्नर, वरूण धवनने केला रिप्लाय

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेविड वॉर्नरने या पोस्टवर नाराजी व्यक्त केली आहे. त्याने रिप्लायमध्ये लिहिले, हे खूप चुकीचे आहे. हे मान्य केले जाऊ शकत नाही. बॉलिवूड अभिनेता वरूण धवनने यावर कमेंट केली. त्याने लिहिले, भयानक वर्तणूक. याशिवाय त्याच्या अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करताना नाराजी व्यक्त केली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी