Virat Kohli Instagram Followers: विराट कोहलीचा सोशल मीडियावर बोलबाला; इंस्टाग्रामवर ठोकले दुहेरी शतक 

Virat Kohli Instagram Followers record । भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या खराब फॉर्मचा सामना करत असला तरी त्याने सोशल मीडियावर आपली प्रसिद्धी कायम ठेवली आहे.

Virat Kohli has become the first cricketer to reach the milestone of 200 million followers on Instagram
विराट कोहलीने इंस्टाग्रामवर फॉलोअर्सचे ठोकले दुहेरी शतक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • विराट कोहलीचा सोशल मीडियावर बोलबाला.
  • विराट कोहलीने इंस्टाग्रामवर फॉलोअर्सचे ठोकले दुहेरी शतक.
  • २० कोटी फॉलोअर्सचा टप्पा गाठणारा विराट पहिला क्रिकेटर ठरला आहे.

Virat Kohli Instagram Followers record । मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली\ (Virat Kohli) सध्या खराब फॉर्मचा सामना करत असला तरी त्याने सोशल मीडियावर आपली प्रसिद्धी कायम ठेवली आहे. कारण क्रिकेटच्या मैदानावर खराब फॉर्मचा सामना करत असलेल्या विराटने इंस्टाग्रामवर दुहेरी शतक ठोकले आहे. लक्षणीय बाब म्हणजे मागील मोठ्या कालावधीपासून विराटला कोणतीच मोठी खेळता आली नाही, मात्र आयपीएलमधील त्याच्या एका अर्धशतकीय खेळीने त्याच्या चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहचला होता. परंतु एक अर्धशतकीय खेळीचा अपवाद वगळता कोहलीला आयपीएलच्या १५ व्या हंगामात साजेशी खेळी करण्यात अपयश आले. दरम्यान आता विराटने इंस्टाग्रामवर दुहेरी शतक ठोकून सर्वांचेच लक्ष वेधले आहे. (Virat Kohli has become the first cricketer to reach the milestone of 200 million followers on Instagram). 

अधिक वाचा : या ५ अक्षरांच्या नावाची मुले बनतात देवदास

विराट सोशल मीडियावर सुसाट

विराट कोहलीचा सोशल मीडियावर बोलबाला, इंस्टाग्रामवर द्विशतक ठोकत विराट कोहलीच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि सोशल मीडिया याचा ताजा पुरावा आहे. सध्या कोहलीच्या बॅटमधून शतक किंवा द्विशतक मैदानावर दिसत नसले तरी विराटने दुहेरी शतक झळकावून इंन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नक्कीच वाढवले ​​आहेत. आता विराटने या सोशल मीडिया साइटवर २० कोटी फॉलोअर्स पूर्ण केले आहेत. लक्षणीय बाब म्हणजे २० कोटी फॉलोअर्सचा टप्पा गाठणारा तो पहिला क्रिकेटर ठरला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

दरम्यान किंग कोहलीने आपल्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी एक इंस्टाग्राम पोस्ट देखील शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याच्या अनेक व्हिडीओ आणि फोटोंसह लिहिले आहे, '२०० मिलियन मजबूत, तसेच माझ्या सपोर्टसाठी सर्वांचे आभार. दरम्यान आगामी भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील मालिकेसाठी विराट कोहलीसह रोहित शर्मा यांना विश्रांती देण्यात आली आहे. मात्र या दोन्ही दिग्गज खेळाडूंना मागील काही कालावधीपासून त्यांना साजेशी खेळी करण्यात अपयश आले आहे. 

कोण-कोण आहे शर्यतीत

इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्सच्या यादीत विराट कोहली आता क्रीडा विश्वात तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत केवळ पोर्तुगालचा महान फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो (४५ कोटी) आणि अर्जेंटिनाचा फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सी (३३ कोटी) यांचा समावेश आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी