IND vs SA 2nd Test: पुण्यात विराट सेनेचा विजय, दक्षिण आफ्रिकेचा पराभव

IND vs SA, 2nd Test: भारतानं दक्षिण आफ्रिकेला पुणे टेस्टमध्ये एक डाव आणि 137 धावांच्या अंतरांनी मात करत तीन मॅचच्या सीरिजमध्ये 2-0 आघाडी घेतली आहे.

IND vs SA 2nd Test
पुण्यात विराट सेनेचा विजय, दक्षिण आफ्रिकेचा पराभव  |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

  • विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियानं फॉफ डुप्लेसीच्या नेतृत्त्वाखाली खेळणारी दक्षिण आफ्रिकेच्या टीमला लागोपाठ दुसऱ्या सामन्यात मात दिली आहे.
  • तीन मॅचच्या सीरिजमध्ये भारतानं 2-0 अशी आघाडी घेतली.
  • दुसऱ्या कसोटीत भारतानं दक्षिण आफ्रिकेवर एक डाव आणि 137 धावांनी दणदणीत विजय मिळवला.

पुणेः  विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियानं फॉफ डुप्लेसीच्या नेतृत्त्वाखाली खेळणारी दक्षिण आफ्रिकेच्या टीमला लागोपाठ दुसऱ्या सामन्यात मात दिली आहे. तीन मॅचच्या सीरिजमध्ये भारतानं 2-0 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या कसोटीत भारतानं दक्षिण आफ्रिकेवर एक डाव आणि 137 धावांनी दणदणीत विजय मिळवला. पुणे कसोटीच्या चौथ्या दिवसातल्या डावात 326 धावा केल्यानंतर फॉलो ऑन खेळण्यासाठी उतरलेली दक्षिण आफ्रिकेची टीम 189  धावांवर बाद झाली. टीम इंडियानं एक डाव आणि137 धावांनी मॅच आपल्या नावावर करून घेतला. 

दुसऱ्या डावात सुद्धा दक्षिण आफ्रिकेचा टॉप ऑर्डर गडगडला. कोणीही दक्षिण आफ्रिकेचा बॅट्समन भारतीय बॉलर्सचा सामना करू शकला नाही. पहिल्या डावाप्रमाणेच केशव महाराज आणि वर्नान फिलेंडरची जोडी काही वेळासाठीच मैदानावर टिकू शकली. ही जोडी तुटल्यानंतर पुन्हा एकदा टीमच्या धावांवर फरक जाणवला. दुसऱ्या डावात भारतासाठी सर्वांत जास्त 3 विकेट उमेश यादवनं घेतले. अश्विन- जडेजानं 2-2 विकेट घेतले. 

 

 

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये पुण्यात खेळण्यात आलेल्या सीरिजच्या दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. शनिवारी पहिल्या डावात अतिथी टीमला 275 धावावर बाद केल्यानंतर टीम इंडियानं 326 धावाची आघाडी घेतली आहे. टीम इंडियानं आपल्या पहिल्या डावात 601/5 स्कोर घोषित केली होती. 

टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेला पुणे टेस्टमध्ये मात देऊन सतत 11 वी टेस्ट सीरिज जिंकून आपला रेकॉर्ड कायम ठेवला. याआधी पहिल्यांदा ऑस्ट्रेलियानं दोन वेळा  सतत 10 सीरिज जिंकली होती.

दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिका टीमची खराब सुरूवात 

फॉलो ऑन खेळण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरूवात खूप वाईट झाली. दुसऱ्या डावाच्या आधी ओव्हरमध्ये एडन मार्करम इशांतच्या दुसऱ्या बॉलवर एलबीडब्ल्यू होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. तो आपलं खातंही खोलू शकला नाही. त्यानंतर नंबर तीनवर बॅटिंग करण्यासाठी आलेला डि ब्रायन सुद्धा जास्त वेळ मैदानावर टिकला नाही आणि उमेश यादवच्या बॉलवर विकेटकीपर साहानं आऊट केलं. त्यांना 18 बॉलमध्ये केवळ 8 धावा करू शकला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी