IND vs NZ: पराभवानंतर विराट कोहली म्हणतो... 

Virat Kohli, India vs New Zealand Semi Final: आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ च्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाच्या पराभवानंतर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं काय प्रतिक्रीया दिली आहे ती पाहूया. 

virat Kohli
IND vs NZ: पराभवानंतर विराट कोहली म्हणतो...   |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

  • पराभवामुळे आम्ही नाराज झालो- विराट कोहली
  • विराट म्हणतो, जडेजानं स्वतःला सिद्द केलं
  • विराट कोहलीकडून धोनी आणि जडेजाचं कौतुक

Virat Kohli, India vs New Zealand World Cup Semi Final: आज मॅन्चेस्टर ओल्ड ट्रॅफर्डमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड कप २०१९ चा पहिला सेमीफायनलचा सामना झाला. या सामन्यात टीम इंडियाला न्यूझीलंडकडून पराभव पत्कारावा लागला.  पावसामुळे हा सामना मंगळवार आणि बुधवारी खेळला गेला. टीम इंडियाला न्यूझीलंडनं २४० रनचं लक्ष्य दिलं होतं. टीम इंडियाची सुरूवात खूप खराब झाली. मात्र त्यानंतर महेंद्र सिंग धोनी (५०) आणि रविंद्र जडेजा (७७) नं शानदार भागेदारी करत आशा पुन्हा जागवल्या. मात्र शेवटच्या क्षणात कीवी टीमनं भारताचा डाव ४९.३ ओव्हरमघ्ये २२१ धावांवर गुंडाळत दुसऱ्यांदा फायनलमध्ये जागा निश्चित केली. सामन्यानंतर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं प्रेजेंटशन सेरेमनी आणि पोस्ट मॅच प्रेजेंटेशनमध्ये आपली निराशा व्यक्त केली. 

पराभवानंतर प्रेजेंटेशन सेरेमनी आणि पत्रकार परिषदेत कॅप्टन विराट कोहलीनं म्हटलं की, आमच्या सगळं काही होतं ज्याची मैदानावर गरज होती. आमचा कालचा दिवस चांगला होता. आम्हांला वाटलं की सर्व ठिक आहे. मात्र न्यूझीलंडच्या बॉलर्संनी चांगली कामगिरी केली. त्यांना मैदानावर चांगली स्विंग मिळाली. त्यांनी चांगल्या खेळाचं उदाहरण सादर केलं. 

जडेजा अव्वल ठरला 

विराट कोहली रविंद्र जडेजा कौतुक करत म्हणाला की, जडेजानं दोन सामन्यात चांगली कामगिरी केली. त्याचा खेळ चांगला होता. एमएस (महेंद्रसिंग धोनी)नं त्यांच्यासोबत चांगली भागेदारी केली. हा सामना एक मार्जिनचा होता आणइ एमएस धोनी रन आऊट झाला होता. विराटनं पत्रकार परिषदेत म्हटलं की, जडेजा आणि मांजरेकर यांच्यामध्ये एका आठवड्यापासून जे काही त्याबद्दल मला जास्त काही माहित नाही मात्र जडेजानं मैदानावर दाखवून दिलं की तो किती सक्षम आहे. त्यानं घरगुती क्रिकेटमध्ये तीन तिहेरी शतकं केलं आणि कदाचित त्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी अजून काही नको. 

ती ४५ मिनीटं... 

त्यानंतर विराटनं टीमचं कौतुक केलं. तसंच टीम इंडियानं वर्ल्ड कप २०१९ मध्ये चांगली कामगिरी केल्याचं विराट म्हणाला. टीम इंडियाचा पराभव हा फक्त ४५ मिनिटांच्या खेळीमुळं झाला असं देखील विराट म्हणाला. टीम इंडियानं ५ धावांवर आपले ३ विकेट्स गमावले. टीम इंडियानं आपला तिसरा विकेट केएल राहुलच्या रूपानं चौथ्या ओव्हरमध्ये गमावला. यावेळी मॅट हेनरीनं रोहित शर्मा (१), विराट कोहली आणि लोकेश राहुलला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर १० व्या ओव्हरमध्ये दिनेश कार्तिक (६) ही आऊट झाला. हे सर्व काही सुरूवातीच्या ४५ मिनिटांमध्ये झालं आणि विराटनं याच गोष्टीचा उल्लेख केला. विराट कोहलीनं म्हटलं की, ती ४५ मिनिटं खराब क्रिकेट तुम्हांला टूर्नामेंटमधून बाहेर करू शकते. 

आमचं शॉट सेलेक्शन चांगलं हवं होतं. 

विराट कोहलीनं म्हटलं की, हे पचवणं मुश्किल आहे पण न्यूझीलंड विजयासाठी पात्र होती.  आमची शॉट सेलेक्शन चांगली असू शकत होती. मात्र आम्ही पूर्ण टूर्नामेंटमध्ये टॉप लेव्हलचं प्रदर्शन केलं.  

आम्ही नाराज झालो...

पुढे विराट कोहलीनं म्हटलं की, आम्ही वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी केली आणि सतत चांगला खेळ खेळलो. आम्ही पॉईंट्स टेबलमध्येही टॉपवर होतो. बस केवळ एक खराब दिवस तुमची सगळी मेहनत खराब करू शकतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
IND vs NZ: पराभवानंतर विराट कोहली म्हणतो...  Description: Virat Kohli, India vs New Zealand Semi Final: आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ च्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाच्या पराभवानंतर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं काय प्रतिक्रीया दिली आहे ती पाहूया. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola