४२ व्या वनडेतल्या शतकासोबत विराट कोहलीवर रेकॉर्डचा पाऊस 

विराट कोहलीनं रविवारी वेस्ट इंडिजच्या विरोधात पोर्ट ऑफ स्पेनमध्ये शतक झळकावत बरेच मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर केलेत. एक नजर टाकूया विराटच्या नव्या रेकॉर्ड्सवर. 

virat Kohli
४२ व्या वनडेतल्या शतकासोबत विराट कोहलीवर रेकॉर्डचा पाऊस   |  फोटो सौजन्य: Twitter

पोर्ट ऑफ स्पेन: भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहलीचा पाच महिन्यांपासून सुरू असलेला दुष्काळी खेळ रविवारी वेस्ट इंडिज विरूद्ध खेळताना संपला आहे. विराटनं सिरीजच्या दुसऱ्या वनडेत १२५ बॉलवर १२० रन्सची खेळी केली आणि टीमला मोठ्या स्कोअरपर्यंत घेऊन जाण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. विराटनं आपल्या खेळीदरम्यान १४ फोअर आणि १ सिक्स मारला. वनडे क्रिकेटमध्ये ११ व्या इनिंगनंतर विराटनं शतक झळकावलं आहे. याआधी त्यानं ऑस्ट्रेलिया विरूद्धा नागपूर आणि रांचीमध्ये लागोपाठ दोन शतक ठोकले होते. त्यानंतर विराटनं कोणतंही शतक झळकावलं नाही. वर्ल्ड कप दरम्यानं त्यानं लागोपाठ पाच अर्धशतक केले मात्र एकदा ही तीन अंकी आकडा विराट पार करू शकला नाही. 

विराटनं वेस्ट इंडिजविरूद्ध खेळताना पुन्हा एकदा शानदार बॅटिंग केली. वेस्ट इंडिजच्या गेल्या ८ खेळीदरम्यान त्याच हे पाचवं शतक आहे. विराटची यजमान टीमविरूद्ध गेल्या आठ खेळी  (111*, 140, 157*, 107, 16, 33*, 72, 100*)  वर नजर टाकल्यास लक्षात येतं की, विराट केवळ एकदाच वेस्ट इंडिजविरूद्ध अर्धशतक करण्यात अपयशी ठरला. 

रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक 

विराटनं दुसऱ्या वनडेमध्ये ८८ रन करत वेस्ट इंडिजविरूद्ध ३५ व्या मॅचमध्ये ३४ व्या खेळीत २ हजार रन पूर्ण केले. त्यासोबतच विराट कोणत्याही टीमविरूद्ध सर्वात वेगानं २ हजार रन करणारा खेळाडू ठरला आहे. विराटच्या आधी हा रेकॉर्ड हिटमॅन रोहित शर्माच्या नावावर होता. त्यानं ऑस्ट्रेलिया विरूद्ध ३७ खेळीत २ हजार पूर्ण केले होते. तर सचिन तेंडुलकरनं ऑस्ट्रेलियाविरूद्ध ४० व्या खेळीत २ हजार केले होते आणि या यादीत तिसऱ्या नंबरवर आहे. 

सौरव गांगुलीला टाकलं मागे 

विराट कोहली वनडे क्रिकेटमध्ये सौरव गांगुलीला मागे टाकतं आठवा सर्वांत जास्त रन करणारा खेळाडू बनला आहे. त्यानं रविवारी आपल्या १२०च्या रनच्या खेळीदरम्यान गांगुलीला मागे टाकलं. विराट २३८ मॅचच्या २२९ खेळीत ११४०६ रन झाले आहेत. सौरव गांगुलीच्या नावे वनडेत ११,३६३ रन आहेत. आता सर्वांत जास्त रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत नवव्या स्थानावर आहे. 

वनडेत सर्वांत जास्त रन 

खेळाडू               रन 
   
सचिन तेंडुलकर 18,426 
कुमार संगकारा 14,234
रिकी पॉन्टिंग 13,704 
सनथ जयसूर्या   13,430
महेला जयवर्धने 12,650 
इंजमाम उल हक 11,739
जॅक कॅलिस 11,579 
विराट कोहली 11,406*
सौरव गांगुली   11,363


 वेस्ट इंडिजविरूद्ध सर्वांत जास्त रन 

विराट कोहलीनं आपल्या शतकीय खेळीदरम्यान १९ वा रन जसा केला तेव्हा वेस्ट इंडिजविरूद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वांत जास्त रन करणारा बॅट्समन ठरला आहे. त्यानं पाकिस्तानचे माजी दिग्गज बॅट्समन जावेद मियांदादला मागं टाकलं आहे. मियांदादनं ६४ मॅचच्या ६४ खेळीत वेस्ट इंडिजविरूद्ध १९३० रन केले होते. विराट कोहलीनं विंडीज विरूद्ध ३४ व्या खेळीत हा आकडा मागे टाकला. विराटच्या नावे आता वेस्ट इंडिजविरूद्ध २००८ रन झाले आहेत. 

एक टीमविरूद्ध सर्वांत जास्त शतक

विराट कोहलीनं रविवारी वेस्ट इंडिजविरूद्ध आठवं शतक केलं. यासोबतच विराट कोणत्या तरी एका टीमविरूद्ध सर्वांत जास्त शतक करण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकरनंतर दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. सचिननं ऑस्ट्रेलियाविरूद्ध सर्वांत जास्त ९ शतक केलेत तर श्रीलंकाविरूद्ध ८ शतक केले आहेत. तर विराट कोहलीचे श्रीलंका, ऑस्ट्रेलियानंतर वेस्ट इंडिजविरूद्ध सुद्धा ८ शतक झाले आहेत. विराटनं आपल्या ४२ शतकांमध्ये २४ या तीन टीमविरूद्ध केलेत. 

खेळाडू    टीम   शतक
     
सचिन तेंडुलकर  ऑस्ट्रेलिया 9
सचिन तेंडुलकर श्रीलंका 8
विराट कोहली ऑस्ट्रेलिया 8
विराट कोहली श्रीलंका 8
विराट कोहली वेस्ट इंडिज

 

वेस्ट इंडिजविरूद्ध सर्वांत जास्त शतक 

विराट कोहली वेस्ट इंडिजविरूद्ध वनडेत सर्वांत जास्त शतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अन्य खेळाडूंपेक्षा तीन पावलं पुढे पोहोचला आहे. विराटनं विंडीजविरूद्ध ३४ खेळीत ८ शतक केलेत. तर दुसऱ्या स्थानावर हाशिम अमला, एबी डिव्हिलियर्स आणि हर्शल गिब्सनं ५-५ शतक केले. हे तिन्हीही खेळाडू दक्षिण आफ्रिकेचे आहेत आणि त्यांनी या शतकांसाठी क्रमशः १६,२२ आणि २९ खेळी केली. 

कॅप्टन म्हणून २० वं शतक 

विराट कोहलीनं वनडे क्रिकेटमध्ये आपल्या कॅप्टनशिपमध्ये रविवारी २० वं शतक केलं. याआधी विराटनं धोनीच्या कॅप्टनशिपमध्ये १९ शतक केले होते. तर विरेंद्र सेहवागच्या कॅप्टनशिपमध्ये विराटनं २ आणि गौतम गंभीरच्या कॅप्टनशिपमध्ये १ शतक केले. 

कॅप्टन म्हणून एका टीमविरूद्ध सर्वात जास्त शतक 

विराट कोहली एका टीमविरूद्ध खेळतान एक कॅप्टन म्हणून सर्वांत जास्त शतक करणारा खेळाडू ठरला आहे. त्यानं वेस्ट इंडिजविरूद्ध कॅप्टनम्हणून रविवारी सहावं शतक केलं. याआधी विराट रिकी पॉन्टिंगसोबत बरोबरीनं होतं. पॉन्टिंगनं न्यूझीलंडविरूद्ध कॅप्टन म्हून ५ शतक केले होते. 

एक टीमविरूद्ध कॅप्टनशिप करताना सर्वांत जास्त शतक 

खेळाडू    टीम शतक
     
विराट कोहली वेस्ट इंडिज 6
रिकी पॉन्टिंग न्यूजीलंड 5
रिकी पॉन्टिंग इंग्लंड 4
रिकी पॉन्टिंग भारत 4
एबी डिविलियर्स भारत   4

 

कॅप्टन म्हणून कॅरेबियनच्या देशात सर्वांत जास्त खेळी 

विराट कोहली दुसऱ्या वनडेत १२० रनच्या खेळीसह कॅरेबियनच्या देशात कॅप्टन म्हणून सर्वांत जास्त खेळी करणारा कॅप्टन ठरला आहे. याआधी कॅप्टनत्या रूपात सर्वांत मोठी खेळीचा रेकॉर्ड ब्रायन लाराच्या नावावर दाखल होता. लारानं २००३ साली ब्रिजटाऊनमध्ये श्रीलंकेविरूद्ध ११६ रनच्या कॅप्टनी खेळी केली होती. 


कॅप्टन म्हणून वेस्ट इंडिजविरूद्ध सर्वांत जास्त स्कोअर 

 

खेळाडू टीम वेन्यू वर्ष  
       
विराट कोहली वेस्ट इंडिज पोर्ट ऑफ स्पेन 2019
ब्रायन लारा श्रीलंका ब्रिजटाउन 2003
महेला जयवर्धने न्यूजीलंड किंग्सटन 2007 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
४२ व्या वनडेतल्या शतकासोबत विराट कोहलीवर रेकॉर्डचा पाऊस  Description: विराट कोहलीनं रविवारी वेस्ट इंडिजच्या विरोधात पोर्ट ऑफ स्पेनमध्ये शतक झळकावत बरेच मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर केलेत. एक नजर टाकूया विराटच्या नव्या रेकॉर्ड्सवर. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...