IND vs WI मध्ये रंगणार सामना, जाणून घ्या कसं असेल वातावरण 

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पुढील सामना या टूर्नामेंटमधून बाहेर झालेल्या वेस्ट इंडिजसोबत आहे. जाणून घेऊया या सामन्यात हवामान कसं असेल. 

ICC World Cup 2019
IND vs WI मध्ये रंगणार सामना, जाणून घ्या कसं असेल वातावरण   |  फोटो सौजन्य: Twitter

IND vs WI Match: क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्त्वात खेळणारी टीम इंडियाचा पुढील सामना या टूर्नामेंटमधून बाहेर झालेल्या वेस्ट इंडिजसोबत असणार आहे. आतापर्यंत टीम इंडियानं या वर्ल्ड कपमध्ये एकही सामना गमावला नाही आहे. अशात कॅप्टन विराट कोहली वेस्ट इंडिजविरूद्ध खेळताना आपल्या विजयाचा अभियान जारी ठेवण्याच्या हेतूनं मैदानात उतरतील. या सामन्याच्या आधी होत असलेल्या पावसामुळे दोन्ही टीमना इंडोर प्रॅक्टिस करावी लागली. अशातच फॅन्स अपेक्षा करत आहेत की, गुरूवारी होणाऱ्या  मॅनचेस्टरमध्ये होणाऱ्या सामन्यात इंद्र देव सामन्याच्या उत्साहावर विरजण पाडणार नाहीत. 

हवामान अंदाजानुसार, असं वाटतं की गुरूवारी मॅनचेस्टरमध्ये फॅन्सना पूर्ण १०० ओव्हरचा खेळ बघायला मिळण्याची शक्यता आहे. हवामान अंदाजानुसार गुरूवारच्या दिवशी मॅनचेस्टरमध्ये पावसाची कोणतीही शक्यता नाही आहे. क्रिकेटप्रेमींना रखरखत्या उन्हात सामना बघायला मिळणार आहे. अशातच दोन्ही टीम सुद्धा पावसाच संकट नसल्यानं खूश होणार आहेत. 

मॅनचेस्टरमध्ये होणाऱ्या या सामन्यात टीम इंडियाला फेवरेट टीम मानली जात आहे. विराटची टीम या वर्ल्ड कपमध्ये भक्कम स्थानावर आहे.  तर दुसरीकडे वेस्ट इंडिजची टीम न्यूझीलंडसोबत हरल्यानंतर सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. हा वर्ल्ड कप वेस्ट इंडिजचा सलामी बॅट्समन ख्रिस गेलचा शेवटचा आंतरराष्ट्रीय टूर्नामेंट आहे. अशातच कॅरेबियन टीम भारतविरूद्धच्या सामन्यात कोणत्याही प्रकारची कसर सोडणार नाहीत. 

वेस्ट इंडिज टूर्नांमेंटमधून पहिलीच बाहेर पडली आहे. आता जेसन होल्डरच्या नेतृत्त्वात टीम आपला सन्मान वाचवण्यासाठी जोरदार लढा देताना दिसतील. टीम इंडिया विरूद्ध अफगाणिस्तान हा सामना खूप अटीतटीचा झाला. केवळ ११ धावांच्या विजयांनी टीम इंडियानं अफगाणिस्तानवर विजय मिळवला. त्यामुळे विराट सेना कॅरेबियन टीमसोबत गांभीर्यानं नक्कीच खेळेल.

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पावसामुळे बरेचदा व्यत्यय आल्याचं पाहायला मिळालं. पावसामुळे बरेच सामने रद्द करावे देखील लागले. तर सामना सुरू असताना येणाऱ्या पावसामुळे सामने थांबवावे सुद्धा लागले आहेत. पावसामुळे वर्ल्ड कप २०१९ मध्ये जवळपास तीन ते चार सामने रद्द झाले. त्यानंतर आयसीसीनं आपल्या नियमांमध्ये देखील बदल केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
IND vs WI मध्ये रंगणार सामना, जाणून घ्या कसं असेल वातावरण  Description: वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पुढील सामना या टूर्नामेंटमधून बाहेर झालेल्या वेस्ट इंडिजसोबत आहे. जाणून घेऊया या सामन्यात हवामान कसं असेल. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola