७००० धावांसाठी सातवं द्विशतक, '७' आकडा विराटला ठरला लकी; पुणेकरांसाठी दुग्धशर्करा योग!

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 11, 2019 | 15:36 IST | टाइम्स नाऊ मराठी

Virat Lucky 7: पुणे कसोटीदरम्यान कर्णधार विराट कोहलीने सातव्यांदा द्विशतक झळकवत सात हजार धावा देखील पूर्ण केल्या आहेत. 

virat kohli made seven thousand runs in test with 7th double century
'७' आकडा विराटला ठरला लकी, पुणेकरांसाठी दुग्धशर्करा योग!  |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

 • पुणे ठरलं विराटसाठी लकी, सातवं द्विशतक झळकावलं
 • द्विशतकासोबत विराटच्या कसोटी क्रिकेटमधील सात हजार धावा पूर्ण
 • सर्वात वेगवान सात हजार धावा करणारा विराट तिसरा भारतीय फलंदाज

पुणे: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात शानदार द्विशतक झळकावलं आहे. तसंच यावेळी विराटने ७ हजार कसोटी धावा देखील पूर्ण केल्या. त्यामुळे सात हा आकडा विराटसाठी लकी ठरला आहे. दुसरीकडे पुणेकर चाहत्यांसाठी मात्र हा दुग्धशर्करा योगच ठरला आहे. अशी कामगिरी करणारा तो सातवा भारतीय फलंदाज ठरला आहे. विराटने ८१व्या कसोटीमधील १३८ डावात ही कामगिरी केली आहे. पुणे कसोटीआधी विराटला सात हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी २०० धावांची गरज होती. विराटने पुणे कसोटीत सातवं द्विशतक ठोकून आपल्या सात हजार धावा देखील पूर्ण केल्या. त्याने २९५ चेंडूत २८ चौकारांच्या मदतीने आपल्या कसोटी कारकीर्दीकील सातवं द्विशतक झळकावलं. 

विराटच्या आधी कसोटी क्रिकेटमध्ये भारतसाठी सात हजार धावा सचिन तेंडुलकर (१५,९२१), राहुल द्रविड (१३,२६५), सुनील गावसकर (१०,१२२), व्हीव्हीएस लक्ष्मण (८,७८१), वीरेंद्र सेहवाग (८,५०३), सौरव गांगुली (७,२१२) यांनी ही कामगिरी केली आहे.  

सर्वात वेगवान सात हजार धावा करण्याच्या बाबतीत विराट आता जगातील पाचवा आणि भारतातील तिसरा फलंदाज ठरला आहे. जगात सर्वात वेगाने ७ हजार कसोटी धावा करण्याचा विक्रम इंग्लंडच्या वॉली हेमंड याच्या नावावर जमा आहे. त्याने ८० कसोटीत १३१ डावांमध्ये ७००० धावा केल्या होत्या. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर भारताचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग हा आहे. सेहवागने ७ हजार धावा या ७९ कसोटीत १३४ डावांमध्ये पूर्ण केल्या. यानंतर तिसऱ्या स्थानी सचिन तेंडुलकर आहे. ज्याने ८५ कसोटीत १३६ डावांमध्ये हा आकडा पार केला. त्यामुळे आता विराट हा सचिन आणि सेहवागनंतर तिसरा फलंदाज ठरला आहे. 

विराटने सात हजार धावा ५४.६१च्या सरासरीने केल्या आहेत. या दरम्यान, त्याने २६ शतकं आणि २२ अर्धशतकं झळकावली आहे. तसंच तो ९ वेळा शून्यावर बाद झाला आहे. त्याची सर्वोच्च खेळी २४३ धावांची आहे. ही खेळी त्याने श्रीलंकेविरुद्ध दिल्लीतील कोटला मैदानावर केली होती. पण आजच्या सामन्यात विराट आपला हा विक्रम देखील मोडीत काढला आहे. सध्या तो २४६ धावांवर खेळतो आहे. 

 • भारतासाठी सर्वात वेगवान 7 हजार कसोटी धावा
 •  खेळाडू                  मॅच     डाव 
 1. वीरेंद्र सेहवाग           79     134 
 2. सचिन तेंडुलकर        85     136 
 3. विराट कोहली          81*    138
 4. सुनील गावसकर       80      140 
 5. राहुल द्रविड             82      141 
 • जगात सर्वात वेगवान 7 हजार कसोटी धावा 
 •     खेळाडू               देश          मॅच     डाव 
 1. वॉली हेमंड             इंग्लंड        80       131 
 2. वीरेंद्र सेहवाग         भारत         79       134 
 3. सचिन तेंडुलकर      भारत         85       136 
 4. गॅरी सोबर्स            वेस्टइंडीज   79       138 
 5. विराट कोहली       भारत          81*      138
 6. कुमार संगकारा    श्रीलंका         83       138 
 • भारतासाठी सात हजार धावा करणारे फलंदाज 
 • खेळाडू                 मॅच      डाव         धावा
 1. सचिन तेंडुलकर      200       329       15,921 
 2. राहुल द्रविड           163       284      13,265 
 3. सुनील गावसकर     125       214      10,122
 4. व्हीव्हीएस लक्ष्मण    134       225        8,781
 5. वीरेंद्र सेहवाग        103       178        8,503
 6. सौरव गांगुली         113       188        7,212
 7. विराट कोहली         81      138        7,000*

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी