मुंबई : टीम इंडियाचा (Team India) कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हे आपल्या पर्सनल लाईफ बाबत खूपच कमी बोलतात. पण आता विराट कोहलीने अनुष्का शर्मा सोबतची पहिली भेट कशी होती यावर भाष्य केलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विराटने अनुष्का सोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा शेअर केला आहे.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या पहिल्या भेटीची कहाणी खूपच रंजक आहे. एका अॅड शूट दरम्यान सर्वप्रथम हे दोघे एकमेकांना भेटले होते. शूटिंगसाठी जेव्हा दोघेही सेटवर पोहोचले तेव्हा नर्वस असलेल्या विराटने अनुष्कासोबत बोलताना एक चूक केली. ज्यानंतर विराटला त्यावर स्पष्टीकरणही द्यावे लागले होते.
झालं असं होतं की, जेव्हा अभिनेत्री अनुष्का शर्मा शूटसाठी सेटवर दाखल झाली तेव्हा तिने खूप उंच हील्स घातल्या होत्या. त्या हील्स पाहून विराट म्हणाला होता की, ६ फूट उंच नाहीये आणि त्यामुळे इतक्या मोठ्या हील्स घालाव्या लागत आहेत.
(फोटो सौजन्य : Instagram)
विराटने केलेल्या या वक्तव्यावर अनुष्का शर्मा म्हणाली, एक्सक्यूज मी (Excuse me). अनुष्का शर्माची ही प्रतिक्रिया ऐकून विराटला वाटले की त्याने काहीतरी चुकीचं म्हटलं. यानंतर अनुष्काचा मूड हलका करण्यासाठी विराट केवळ मजा-मस्ती करत राहिला. एका मुलाखतीत विराट कोहलीने हा किस्सा सांगितला आहे.
(फोटो सौजन्य : Instagram)
यानंतर विराट - अनुष्का यांच्यात भेटीगाठी सुरू झाल्या आणि मग दोघांत प्रेमसंबंध झाल्याचं बोललं जात आहे. अनेक महिने दोघे एकमेकांना डेट करत होते. मग, दोघांनी विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला. २०१७ मध्ये विराट-अनुष्काने लग्न केलं आणि आता त्यांना एक मुलगी आहे.