virat kohli: ओव्हलच्या मैदानावर विराटची पुन्हा धमाल, केला हा रेकॉर्ड

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 10, 2022 | 17:04 IST | टाइम्स नाऊ मराठी

virat kohli record: विराट कोहलीने ऑस्ट्रेलियातील आपल्या आवडत्या मैदानावर इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये आंतरराष्ट्रीय चार हजार धावा पूर्ण केल्या. असे करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. 

virat kohli
ओव्हलच्या मैदानावर विराटची पुन्हा धमाल, केला हा रेकॉर्ड 
थोडं पण कामाचं
  • यानंतर विराट कोहलीने आपला खेळ कायम ठेवताना 39 बॉलमध्ये सध्याच्या वर्ल्डकपमधील चौथे आणि एकूण 14वे अर्धशतक ठोकले.
  • हे त्याचे आंतरराष्ट्रीय टी20 करियरमधील 37वे अर्धशतक आहे.
  • कोहलीने जसा 42 धावांचा आकडा पार केला तसा तो टी20मध्ये 4 हजार धावा पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला. 

अॅडलेड: विराट कोहली(virat kohli) आणि अॅडलेडचे मैदान(Adelaide Oval) यांच्यातील स्पेशल कनेक्शन गुरूवारी टी20 वर्ल्डकपच्या(t-20 world cup 2022)  दुसऱ्या सेमीफायनल सामन्यातही पाहायला मिळाले. केएल राहुल(KL rahul) बाद झाल्यानंतर विराट कोहलीला फलंदाजी करण्याची संधी लवकर मिळाली. अशातच फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीने आपली लय कायम राखताना चांगली सुरूवात केली. कोहलीने जसा 42 धावांचा आकडा पार केला तसा तो टी20मध्ये 4 हजार धावा पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला. virat kohli make a record on Adelaide Oval ground

अधिक वाचा - संजय राऊत यांना पुन्हा अटक करतील - उद्धव ठाकरे

टी20 वर्ल्डकप 2022मध्ये कमालीचा खेळ 

यानंतर विराट कोहलीने आपला खेळ कायम ठेवताना 39 बॉलमध्ये सध्याच्या वर्ल्डकपमधील चौथे आणि एकूण 14वे अर्धशतक ठोकले. हे त्याचे आंतरराष्ट्रीय टी20 करियरमधील 37वे अर्धशतक आहे. विराट मोठी खेळी करू शकला नाही. तो शॉर्ट थर्ड मॅनवर क्रिस जॉर्डनच्या बॉलवर कॅच देत बाद झाला. विराटने आपल्या डावात चार चौकार आणि एक षटकार ठोकला.  

टी20 वर्ल्डकपमध्ये चार अर्धशतके ठोकणारा पहिला खेळाडू

सध्याच्या वर्ल्डकपमध्ये विराटने धमाल करताना 6 सामन्यातील 6 डावांत 98.66च्या सरासरीने आणि 136.40च्या स्ट्राईक रेटने 296 धावा केल्या आहेत. विराटचा या दरम्यानन सर्वाधिक स्कोर नाबाद 82 इतका राहिला. ही खेळी त्याने पाकिस्तानविरुद्ध मेलबर्नमध्ये ेकेली होती. विराट कोहली टी20 वर्ल्डकपमध्ये चार अर्धशतके ठोकणारा पहिला फलंदाज ठरला आहे. 

अशी आहे विराटची आंतरराष्ट्रीय टी20मध्ये कामगिरी

विराटच्या नावावर आधीपासूनच आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड आहे. विराट कोहलीने आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या 115 सामन्यांतील 107 डावांमध्ये फलंदाजी करताना 4008 धावा केल्या आहेत. या धावा त्याने 137.96 चा स्ट्राईक रेट आणि 52.73च्या सरासरीने केल्या आहेत. यात 37 अर्धशतके आणि एका शतकाचा समावेश आहे. विराटची सर्वोत्कृष्ट कामगिरी नाबाद 122 धावा इतकी आहे. 

अधिक वाचा - 21 दिवसांचा संसार उद्धवस्त, पोलिसांनी पत्नीला घेतलं ताब्यात

भारताचा मानहानीकारक पराभव

इंग्लंडविरुद्धच्या टी20 वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये भारताचा दारूण पराभव झाला. भारताने विजयासाठी ठेवलेले 169 धावांचे आव्हान इंग्लंडने सहज पूर्ण केले आणि 10 विकेट राखून विजय मिळवला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी