विराट कोहली द. आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत नाही खेळणार

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Dec 14, 2021 | 17:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

virat kohli: भारताच्या मर्यादित षटकांचे कर्णधारपद काढून घेतल्यानंतर कोहलीने निर्णय घेतला आहे की तो द. आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत खेळणार नाही आहे. एका रिपोर्टमधये सांगितले जात आहे की विराट कोहली वनडे मालिकेतून आराम करणार आहे. 

virat kohli
विराट कोहली द. आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत नाही खेळणार 
थोडं पण कामाचं
  • विराट कोहलीकडून कर्णधारपद काढून घेतल्यानंतर ही जबाबदारी रोहितकडे सोपवण्यात आली.
  • आता एएनआयच्या बातमीनुसार विराट कोहली द. आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून आरामाची मागणी करत आहे.
  • विराटच्या या मागणीमुळे बीसीसीआयच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

मुंबई: भारतीय संघ(indian team) या आठवड्यात द. आफ्रिका दौऱ्यासाठी(south africa tour) रवाना होत आहे. भारतीय संघ २६ डिसेंबरपासून द. आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर दोन्ही संघादरम्यान वनडे मालिकेचेही(one day series) आयोजन करण्यात आले आहे. या वनडे मालिकेआधी विराट कोहलीकडून(virat kohli) मर्यादित षटकांचे कर्णधारपद काढून घेण्यात आले. टी-२० कर्णधारपदाचा त्याने आधीच राजीनामा दिला होता. आता जी बातमी समोर येत आहे ती हैराणजनक आहे. यात सांगितले गेले आहे की विराट कोहली द. आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळणार नाही. virat kohli may not played in south africa one day series

विराट कोहलीकडून कर्णधारपद काढून घेतल्यानंतर ही जबाबदारी रोहितकडे सोपवण्यात आली. आता एएनआयच्या बातमीनुसार विराट कोहली द. आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून आरामाची मागणी करत आहे. विराट कोहलीची आरामाची मागणी ही आश्चर्यजनक आहे यासाठी कारण त्याने टी-२०वर्ल्डकप २०२१नंतर न्यूझीलंडविरुद्धच्या तीन टी-२० सामने आणि एका कसोटी सामन्यासाठी विराटला आराम देण्यात आला होता. अशातच असा सवाल येत आहे की विराटने हे पाऊल का उचलले आहे. विराटच्या या मागणीमुळे बीसीसीआयच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

रोहित शर्मा हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे द. आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून बाहेर गेला आहे. त्याची दुखापत गंभीर सांगितली जात आहे. असं मानलं जातंय की तो द. आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत खेळू शकणार नाही. अशातच बीसीसीआयच्या समोर अशी समस्या आहे की आता वनडेत मालिकेत कर्णधारपद कोण सांभाळणार आहे. विराट कोहलीकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले आहे त्यामुळे तो उपलब्ध असणार नाही. इतकंच की बीसीसीआयने वनडे मालिकेसाठी टीम इंडियाच्या उप कर्णधारपदाचीही अद्याप घोषणा केलेली नाही. 

T20 विश्वचषक स्पर्धेच्या ग्रुप स्टेजमधून ज्या क्षणी भारत बाहेर पडला, त्या क्षणी कोहलीची कर्णधारपदावरून हकालपट्टी जवळपास निश्चित झाली होती, परंतु बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना गेल्या साडेचार वर्षांपासून संघाच्या कर्णधाराला सन्माननीय मार्ग द्यायचा होता. शेवटी असे दिसते की कोहलीने बीसीसीआयला त्याला काढून टाकण्यास सांगितले आणि खेळाच्या सर्वोच्च संस्थेने पुढे जाऊन तेच केले आणि नंतर ते स्वीकारण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय उरला नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी