कॅप्टन विराट कोहलीनं मोडला धोनीचा रेकॉर्ड, अशी केली बरोबरी

दक्षिण आफ्रिका विरोधात तीन मॅचच्या सीरिजमध्ये भारतानं 2-0 चा आघाडी मिळवली. या आघाडीमुळे विराट कोहलीनं एमएस धोनीला मागे टाकून सीरिजमध्ये विजयाच्या बाबतीत सर्वात यशस्वी भारतीय टेस्ट कॅप्टन बनला आहे. 

virat kohli
कॅप्टन विराट कोहलीनं मोडला धोनीचा रेकॉर्ड, अशी केली बरोबरी  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • विराट कोहलीनं 50 व्या मॅचमध्ये कॅप्टनशिपची कमान सांभाळत महेंद्र सिंग धोनीचा एक मोठा टेस्ट रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
  • भारतीय टीमनं दक्षिण आफ्रिकेला पुणे टेस्टमध्ये एक डाव आणि 137 धावांच्या अंतरानं आपल्या नावावर करून तीन मॅचच्या सीरिजमध्ये 2-0 अशी आघाडी मिळवली.
  • यासोबतच घरगुती मैदानावर सतत 11 टेस्ट सीरिज जिंकण्याचा नवा वर्ल्ड रेकॉर्ड देखील कायम ठेवला.

पुणेः भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहलीनं 50 व्या मॅचमध्ये कॅप्टनशिपची कमान सांभाळत महेंद्र सिंग धोनीचा एक मोठा टेस्ट रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. भारतीय टीमनं दक्षिण आफ्रिकेला पुणे टेस्टमध्ये एक डाव आणि 137 धावांच्या अंतरानं आपल्या नावावर करून तीन मॅचच्या सीरिजमध्ये 2-0 अशी आघाडी मिळवली. यासोबतच घरगुती मैदानावर सतत 11 टेस्ट सीरिज जिंकण्याचा नवा वर्ल्ड रेकॉर्ड देखील कायम ठेवला. याआधी कोणतीही टीम आपल्या घरगुती मैदानावर 11 टेस्ट सीरिज आपल्या नावावर करू शकली नाही.

याव्यतिरिक्त विराट कोहली टेस्ट कॅप्टनचं अर्धशतक पूर्ण करण्याचा आनंद आणि आणखी मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करून साजरा केला. विराटनं आपल्या कॅप्टनशीपमध्ये 30 वा विजय मिळवत 13 वी टेस्ट सीरिजवर आपलं नाव कोरलं. यासोबतच त्यानं सर्वांत जास्त टेस्ट सीरिज विजयाचा महेंद्र सिंग धोनीचा रेकॉर्ड तोडला. 2014 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट टीमची कमान सांभाळणार विराट आता सीरिज जिंकण्याच्या बाबतीत सर्वांत यशस्वी भारतीय कॅप्टन बनला आहे. या यादीत सौरव गांगुली 9 विजयासोबत तिसऱ्या स्थानावर आहे. 

विराट वेस्ट इंडिज दौऱ्यावर 2-0 च्या अंतराच्या सीरिजच्या विजयासोबत भारताचा सर्वांत यशस्वी टेस्ट कॅप्टन बनला होता. या सीरिजच्या दरम्यान परदेशी भूमीवर सर्वात जास्त टेस्ट जिंकणारा भारतीय कॅप्टन बनला. या आधी हे दोन्ही रेकॉर्ड क्रमशः महेंद्र सिंग धोनी आणि सौरव गांगुलीच्या नावावर दाखल होते. 

 पुण्यात विराट सेनेचा विजय

 विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियानं फॉफ डुप्लेसीच्या नेतृत्त्वाखाली खेळणारी दक्षिण आफ्रिकेच्या टीमला लागोपाठ दुसऱ्या सामन्यात मात दिली आहे. तीन मॅचच्या सीरिजमध्ये भारतानं 2-0 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या कसोटीत भारतानं दक्षिण आफ्रिकेवर एक डाव आणि 137 धावांनी दणदणीत विजय मिळवला. पुणे कसोटीच्या चौथ्या दिवसातल्या डावात 326 धावा केल्यानंतर फॉलो ऑन खेळण्यासाठी उतरलेली दक्षिण आफ्रिकेची टीम 189  धावांवर बाद झाली. टीम इंडियानं एक डाव आणि137 धावांनी मॅच आपल्या नावावर करून घेतला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी