धोनीला मागे टाकत कोहली ठरला सर्वात यशस्वी कॅप्टन

यजमान टीम वेस्ट इंडिजविरूद्ध जमैका येथे टीम इंडियाचा विजय झाल्यानंतर विराट कोहली हा भारतीय टेस्ट क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी टीम इंडियाचा कॅप्टन बनला आहे. यात विराटनं धोनीला मागे टाकलं आहे.

virat Kohli
धोनीला मागे टाकत कोहली ठरला सर्वात यशस्वी कॅप्टन  |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

  • टीम इंडियानं किंग्सटन टेस्टच्या चौथ्या दिवशी यजमान टीम वेस्ट इंडिजचा 257 धावांनी पराभव केला.
  • टीम इंडियानं ही सीरिज 2-0 अशी जिंकली.
  • सामन्यांच्या विजयानंतर विराट कोहलीनं महेंद्रसिंग धोनीला मागे टाकत भारताचा सर्वात यशस्वी टेस्ट कॅप्टन ठरला आहे.

जमैकाः  सोमवारी विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियानं किंग्सटन टेस्टच्या चौथ्या दिवशी यजमान टीम वेस्ट इंडिजचा 257 धावांनी पराभव केला. हा पराभवासोबत टीम इंडियानं ही सीरिज 2-0 अशी जिंकली. अँटिगा येथे खेळल्या गेलेल्या सीरीजच्या पहिल्या टेस्ट सामन्यात भारतानं 318 रन्सच्या फरकानं विजय मिळवला. या दोन सामन्यांच्या विजयानंतर विराट कोहलीनं महेंद्रसिंग धोनीला मागे टाकत भारताचा सर्वात यशस्वी टेस्ट कॅप्टन ठरला आहे.

विराटनं ४८ व्या टेस्ट सामन्यात टीमची कमान सांभाळत २८ वा विजय मिळवला. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं २७ टेस्ट सामने जिंकले होते.माजी कॅप्टन धोनीनं ६० टेस्ट सामन्यात भारताला २७ सामने जिंकून दिले होते. कोहलीनं ४८ व्या सामन्यात २८ वा विजय मिळवून नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. विराट कोहली आशिया खंडातील सर्वांत यशस्वी कॅप्टन ठरला आहे. याशिवाय ४७ सामन्यात सर्वांत कमी पराभव विराट कोहलीनं पाहिले. तसंच कॅप्टन म्हणून कोहलीनं आपल्या टेस्टच्या कारकीर्दीत केवळ दहा सामने गमावलेत. २०१४ मध्ये विराट कोहलीनं टीम इंडियाची सुत्रे सांभाळली. 

भारतासाठी सर्वाधिक कसोटी विजय

सामने  खेळाडू
   
28 विराट कोहली (48)
27 एमएस धोनी (60)
21 सौरव गांगुली (49)
14   मोहम्मद अजहरुद्दीन (47) 


 परदेशात सर्वाधिक यशस्वी भारतीय कॅप्टन

जमैका टेस्टमधील विजयासह विराटनं विदेशी ग्राऊंडवर कॅप्टन म्हणून आपल्या रेकॉर्डमध्ये बदल केला. अँटिगामध्ये जिंकल्यानंतर सौरव गांगुलीला मागे टाकतं विराट परदेशात सर्वात यशस्वी टीम इंडियाच्या टेस्टचा कॅप्टन ठरला. जमैकामध्ये 257 धावांनी विजय मिळवत विराट कोहलीनं परदेशात कॅप्टन म्हणून 27 सामन्यांत 13 सामने जिंकले आहेत. गांगुलीनं परदेशात कॅप्टन म्हणून 28 पैकी 11 कसोटी सामने जिंकले.

 

परदेशी सर्वात यशस्वी कॅप्टन परदेशी सर्वात यशस्वी कॅप्टन
   
सामने  खेळाडू
   
13 विराट कोहली (27) 
11  सौरव गांगुली (28)
06 एमएस धोनी (30)
05  राहुल द्रविड (17)

48 टेस्ट मध्ये कप्तानचा सर्वात जास्त विजय

विराट कोहली ४८ टेस्ट सामन्यात टीमची कमान सांभाळताना सर्वांत जास्त विजय आपल्या नावावर करण्यात जगभरात तिसऱ्या स्थानावर आहे. ४८ टेस्टमध्ये कॅप्टनशिप करत विराटपेक्षा जास्त विजय केवळ ऑस्ट्रेलियाच्या दोन दिग्गज खेळाडू स्टीव्ह वॉ आणि रिक पॉन्टिंग यांनी मिळवला आहे. स्टीव्ह वॉ  48 पैकी ३६ आणि पॉन्टिंगनं 33 सामन्यात विजय मिळवला होता. या यादीत चौथ्या स्थानावर २६ सामन्यांचा विजय मिळवत विवियन रिचर्ड्स आणि मायकल वॉन आहे. 

  • 36     स्टीव वॉ 
  • 33     रिकी पॉन्टिंग 
  • 28     विराट कोहली 
  • 26     विव रिचर्ड्स 
  • 26     माइकल वॉन 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...