T20 नंतर विराट कोहलीकडून घेतले जाणार ODIचे कर्णधारपद? या २ व्यक्ती लवकरच घेणार निर्णय

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Dec 02, 2021 | 12:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

Team india ODI Cpatainship : विराट कोहली (Virat Kohli) ला भारतीय टी-२०चे कर्णधारपद सोडावे लागले कारण त्याला वर्कलोड मॅनेज करता येईल. 

virat kohli
T20Iनंतर कोहलीकडून ODIचे कर्णधारपदही काढून घेणार?  
थोडं पण कामाचं
  • विराटच्या वनडे नेतृत्वावर लवकरच निर्णय
  • किंग कोहलीकडून घेतले जाणार वनडेचे कर्णधारपद?
  • रोहित शर्मा घेऊ शकतो कोहलीची जागा

मुंबई: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२१(ICC T20 World Cup 2021) नंतर विराट कोहली (Virat Kohli) ने भारतीय टी-२० संघाचे(t-20 captainship) कर्णधारपद सोडले होते. आता त्याची वनडे नेतृत्वही(odi captainship) धोक्यात येताना दिसत आहे. असं म्हटलं जातय की वनडे वर्ल्डकप २०२३  (World Cup 2023) लक्षात घेता मॅनेजमेंट याबाबत मोठा निर्णय घेऊ शकते. virat Kohli odi captaincy decision will take soon

विराटच्या नेतृत्वावर लवकरच होणार निर्णय

चेतन शर्माच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय निवड समिती दक्षिण आफ्रिकेच्या आगामी दौऱ्यासाठी टीम इंडियाचे सिलेक्शन करणार तेव्हा विराट कोहली (Virat Kohli) च्या वनडे नेतृत्वाबाबत या आठवड्यात निर्णय होईल. 

दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे काय?

बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की दक्षिण आफ्रिकेत कोविड १९चा नवा व्हेरिएंट आढळून आल्यानंतर दौरा अद्याप रद्द केलेला नाही. दरम्यान, ते सध्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. 

२०२२मध्ये भारत केवळ ९ वनडे खेळणार

२००२मध्ये अधिकाधिक टी-२० सामने खेळवले जाणार आहेत. यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या वर्ल्डकपचाही समावेश आहे. सध्याच्या कार्यक्रमानुसार पुढील ७ महिन्यात भारताला केवळ ९ वनडे सामने खेळायचे आहेत. यात परदेशात ६(दक्षिण आफ्रिका ३ आणि इंग्लंड ३) सामने खेळवले जाणार आहेत. 

कोहलीकडून घेतले जाणार वनडे नेतृत्व?

बीसीसीआयमध्ये एक गट कोहलीला वनडे कर्णधारपदी कायम ठेवण्याच्या बाजूने आहे तर दुसरा गट टी-२० आणि वनडेसाठी एकाच खेळाडूकडे सोपवण्याच्या बाजूने आहे. यामुळे रोहित शर्माला वनडे वर्ल्डकप २०२३च्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल. 

या २ व्यक्ती घेणार निर्णय

आता सवाल हा आहे की विराट कोहलीच्या वनडे नेतृत्वावरून जर बीसीसीआयमध्ये एकमत झाले नाही तर याचा परिणाम काय होईल? असं मानलं जात आहे की या बाबतीत अखेरचा निर्णय बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह घेणार.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी