Virat kohli on the verge of completing 25 thousand international runs : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023 (BORDER GAVASKAR TROPHY 2023) अंतर्गत 4 टेस्ट मॅचची सीरिज सुरू होत आहे. या सीरिजची पहिली टेस्ट मॅच गुरुवार 9 फेब्रुवारी 2023 पासून नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये सुरू होणार आहे. यानंतर अनुक्रमे दिल्ली, धरमशाला, अहमदाबाद या ठिकाणी टेस्ट मॅच होतील. नागपूर टेस्टच्या निमित्ताने भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली याला नवा विक्रम करण्याची संधी आहे.
विराट कोहली इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एका विक्रमापासून फक्त 64 धावांच्या अंतरावर आहे. या 64 धावा करताच विराट कोहली इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 25 हजार धावांचा टप्पा गाठेल.
विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमध्ये 8119, वन डे मध्ये 12809 आणि टी 20 मध्ये 4008 धावा केल्या आहेत. त्याने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एकूण 24 हजार 936 धावा केल्या आहेत. आणखी 64 धावा करताच विराट कोहली इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 25 हजार धावांचा टप्पा गाठेल.
शुभमनचा गिलचे फिटनेस सीक्रेट
...आणि इतिहास घडला !, शेर-शुभमन गिल
इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानावर आहे. सचिनने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 664 मॅच खेळून 34 हजार 357 धावा केल्या आहेत. श्रीलंकेचा कुमार संघकारा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 28 हजार 16 धावा करून यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 27 हजार 483 धावांसह तिसऱ्या स्थानी तर श्रीलंकेचा महेला जयवर्धने 25 हजार 957 धावांसह चौथ्या स्थानी आहे. दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 25 हजार 534 धावा करून यादीत पाचव्या स्थानावर आहे. विराट कोहली इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 25 हजार धावा करून या यादीत प्रवेश करेल. यामुळे क्रिकेटप्रेमींचे लक्ष नागपूरमध्ये विराट कोहलीच्या कामगिरीकडे असेल.
ताज्या आयसीसी टीम रँकिंगनुसार भारत 115 रेटिंगसह टेस्ट क्रिकेटमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे तर 126 रेटिंगसह ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर आहे. वन डे मध्ये 114 आणि टी 20 मध्ये 267 रेटिंगसह भारत पहिल्या स्थानावर आहे.