IND vs SA: द. आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातून विराट आऊट, राहुल करणार नेतृत्व

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 03, 2022 | 13:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

Virat Kohli, Ind Vs Sa: भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. कर्णधार विराट कोहली या सामन्यात खेळत नाही आहे त्याच्या जागी लोकेश राहुलला कर्णधार बनवण्यात आले आहे. 

virat kohli
IND vs SA: आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातून विराट आऊट 
थोडं पण कामाचं
  • दुसऱ्या कसोटीतून विराट कोहली बाहेर
  • विराट कोहलीच्या पाठीला दुखापत
  • लोकेश राहुलकडे नेतृत्व

मुंबई: भारत आणि द. आफ्रिका(india vs south africa) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. दुसऱ्या कसोटीत(second test match) भारताला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार विराट कोहली(captain virat kohli) या सामन्यात खेळत नाही आहे. त्याच्या जागी लोकेश राहुलला(kl rahul) संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. virat kohli out from second test match against south africa

लोकेश राहुलने टॉसवेळेस सांगितले की विराट कोहलीला दुखापत झाली आहे आणि त्याच्या पाठीला त्रास होत आहे. या कारणामुले त्याला आराम देण्यात आला आहे. आशा आहे की पुढच्या कसोटी सामन्यापर्यंत विराट कोहली फिट होईल. विराट कोहलीसाठी हा सामना स्पेशल होता. त्याचा हा ९९वा सामना होता. विराट कोहली जर या सामन्यात खेळला असता तर या मालिकेतील तिसरा सामना त्याचा १००वा सामना असता. मात्र अआता अलले होणार नाही कारण या मालिकेतील तिसरा सामना त्याचा ९९वा कसोटी सामना असेल.

पाठीला त्रास होऊ लागल्याने तो या कसोटीत खेळणार नाही. दरम्यान पुढच्या कसोटीसाठी तो लवकर बरा होईल अशी आशा आहे. प्रत्येक भारतीय खेळाडूचे स्वप्न असते की आपल्या देशाच्या संघाचे नेतृत्व करावे. हे एक आव्हान म्हणून मी पाहत आहे. आम्हाला येथे काही चांगले यश मिळाले आहे आणि आम्ही ते पुढे कायम ठेवण्याचा प्रयत्न करू. हनुमा विहारी विराटच्या जागी खेळत आहे. सेंच्युरियनच्या मैदानावर चांगली कसोटी रंगली. आम्ही एक टीम म्हणून चांगली कामगिरी केली आणि दुसऱ्या कसोटीबाबत मी खूप एक्सायटेड आहे. असे राहुल म्हणाला. 

जर प्लेईंग ११बाबत  बोलायचे झाल्यास विराट कोहलीच्या जागी हनुमा विहारली जागा देण्यात आली आहे. हनुमा विहार दीर्घकाळानंतर संघात पुनरागमन करत आहे. त्याने आपला मागील सामना ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळला होता. 

दुसऱ्या कसोटीसाठी प्लेईंग ११ 

लोकेश राहुल(कर्णधार), मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रवीचंद्रन अश्विन, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी