IND vs SA: विराट कोहली १०० कसोटी खेळण्यापासून ३ सामने दूर, अश्विन तोडू शकतो कपिल देवचा मोठा रेकॉर्ड

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Dec 22, 2021 | 15:09 IST | टाइम्स नाऊ मराठी

द. आफ्रिकामध्ये भारतीय खेळाडूंकडे केवळ मालिका जिंकण्याचाच नव्हे तर अनेक मोठ्या कामगिरी करण्याची संधी आहे. कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, रवीचंद्रन अश्विन आणि मोहम्मद शमी यांच्या नजरा अनेक रेकॉर्डवर आहेत. 

ashwin and virat
IND vs SA: कोहली, अश्विनकडे रेकॉर्ड तोडण्याची संधी 
थोडं पण कामाचं
  • भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार विराट कोहलीकडे १०० कसोटी सामने पूर्ण करण्याची संधी आहे.
  • अश्विन जर मालिकेत आठ विकेट मिळवेल तर तो सर्वाधिक विकेट घेण्याच्या प्रकरणात कपिल देव(४३४) ला मागे टाकेल. 
  • पहिला सामना सेंच्युरियनच्या मैदानावर खेळला जाणार आहे.

मुंबई: भारतीय संघ पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेमध्ये(india vs south africa test series) मालिका जिंकण्याच्या इराद्याने २६ डिसेंबरला मैदानावर उतरणार आहे. टीम इंडिया तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिला सामना सेंच्युरियनच्या मैदानावर खेळला जाणार आहे. भारतीय खेळाडूंकडे केवळ मालिका जिंकण्याचीच संधी नाही तर अनेक रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. कर्णधार विराट कोहली(virat kohli), अजिंक्य रहाणे(ajinkya rahane), चेतेश्वर पुजारा(cheteshwar pujara), रवीचंद्रन अश्विन(r ashwin) आणि मोहम्मद शमी(mohammad shami) यांच्याकडे रेकॉर्ड तोडण्याची संधी आहे. virat kohli, r ashwin may break record in india vs south africa test series

विराट कोहली: भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार विराट कोहलीकडे १०० कसोटी सामने पूर्ण करण्याची संधी आहे. तो यापासून केवळ तीन सामने दूर आहेत. जर कोहली मालिकेतील तीनही सामने खेळेल तर तो १०० कसोटी सामने खेळणारा भारताचा १२ वा क्रिकेटर असेल. विराट आपला १०० वा कसोटी सामना केपटाऊनमध्ये खेळणार. याशिवाय त्याची नजर आठ हजार रनांचा आकडा पार करण्यावर असेल. तो यापासून केवळ १९९ धावा दूर आहे. त्याच्याकडे द. आफ्रिकेत कमीत कमी सहा डाव असतील. 

रवीचंद्रन अश्विन - भारताचा स्टार स्पिनर अश्विन न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत शानदार फॉर्ममध्ये होता. त्याला प्लेअर ऑफ दी सीरिज निवडण्यात आले होते. अश्विनने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत हरभजन सिंगला मागे टाकत रेकॉर्ड केला होता. आता द. आफ्रिकेत त्याची नजर भारताचा महान कर्णधार कपिल देवच्या रेकॉर्डवर असेल. अश्विन जर मालिकेत आठ विकेट मिळवेल तर तो सर्वाधिक विकेट घेण्याच्या प्रकरणात कपिल देव(४३४) ला मागे टाकेल. 

मोहम्मद शमी - न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत मोहम्मद शमीला आराम देण्यात आला होता. द. आफ्रिकेत त्याला संधी मिळू शकते. तो मालिकेत पाच विकेट मिळवण्यात यशस्वी ठरत असेल तर तो एकाखास क्लबमध्ये सामील होईल. शमीच्या कसोटीत १९५ विकेट आहेत. त्याने आणखी पाच विकेट घेतल्या तर तो २०० विकेट घेणारा पाचवा वेगवान भारतीय गोलंदाज ठरू शकतो. 

चेतेश्वर पुजारा - सध्या फॉर्म आणि धावांशी झगडणाऱा चेतेश्वर पुजारा द. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पुनरागमन करण्याच्या तयारीत असेल. भारताचा हा ३ नंबरचा फलंदाज द. आफ्रिकेविरुद्धच्या १४ कसोटींमद्ये ७५८ धावा करण्यात यशस्वी ठरला आहे. या दरम्यान त्याने पाच अर्धशतके तसेच एक शतक ठोकले आहे. डिसेंबर २०१३मध्ये त्याने जोहान्सबर्गच्या मैदानावर १५३ धावांची खेळी केली. जर पुजारा मालिकेत २४२ धावा आणखी करतो तर तो द. आफ्रिकेविरुद्ध एक हजार धावा पूर्ण करेल. 

अजिंक्य रहाणे - पुजाराप्रमाणेच रहाणेही खराब फॉर्मविरुद्ध लढत आहे. पुजाराप्रमाणेच रहाणेही द. आफ्रिकेविरुद्ध १००० धावा बनवण्याच्या जवळ आहे. ३३ वर्षीय या फलंदाजाने आफ्रिकेविरुद्ध १० कसोटी सामने खेळलेत. या दरम्यान त्याने तीन शतक आणि तीन अर्धशतक ठोकलेत. त्याच्या खात्यात ७४८ धावा आहेत. त्याने या मालिकेत २५२ धावा केल्या तर द. आफ्रिकेविरुद्ध त्याच्या नावावर १००० धावा होतील. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी