Virat-Anushka भारताचा अव्वल फलंदाज विराट कोहली सध्याचा सर्वात फिट खेळाडूंमधील एक आहे. आपल्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या विराटचा फिटनेस तरुणांसाठी एक आदर्श उदाहरण आहे. आपल्या फिटनेससाठी विराट खूप मेहनत घेतो. असे असले तरी, हे खूप कमी लोकांना माहीती असेल की, विराट यापूर्वी ड्रिंक्स देखील करायचा. याबद्दलचा खुलासा त्याने पत्नी अनुष्का शर्मासमोर स्वतःहून केला आहे. Virat Kohli recalls his old drinking days and dance love wife Anushka Sharma
अधिक वाचा : New rules:1 एप्रिलपासून लागू होणार 'हे' नवे नियम
इंडियन स्पोर्ट्स ऑनर पुरस्कार सोहळ्यादरम्यान प्रसारमाध्यमांच्या वतीने घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये विराटने याबद्दल खुलासा केला. त्यादरम्यान पत्नी अनुष्का देखील त्याच्यासोबत होती. त्यावेळी या दोघांनी प्रसारमाध्यमांच्या अनेक गंमतीदार प्रश्नांची उत्तरे दिली. अशावेळी विराटने हे मान्य केले की, त्याने आपल्या तारुण्यात प्रत्येक गोष्टींचा आनंद लुटला आहे. तसेच तो प्रचंड फुडी होता. त्याने असे देखील सांगितले की, फिटनेसवर लक्षकेंद्रित करण्यापूर्वी त्याने प्रत्येक पार्टीत मनमौजी आयुष्य जगले आहे, तो पार्टीमध्ये ड्रिंक्सदेखील घ्यायचा.
रॅपिड फायर फेरीमध्ये विराट आणि अनुष्काला विचारले होते, 'तुमच्यापैकी डान्स फ्लोअर कोण जास्त गाजवत?' त्यावेळी अनुष्काने विराटकडे इशारा केला. विराट त्यामुळे चकित झाला, त्याने अनुष्काला विचारलं ' मी काय डान्स फ्लोअर गाजवतो का?' त्यानंतर विराटने आपल्या जुन्या दिवसाचा एक किस्सा सांगितला. कसा तो पार्टीमध्ये मस्ती करायचा हे त्याने यादरम्यान सांगितले.
अधिक वाचा : 'या' सरकारी योजना देतात मुलींच्या स्वप्नांना बळ,असा करा अर्ज
विराट ने सांगितले की, "मी आता ड्रिंक करत नाही, पण सुरुवातीला पार्टीत गेल्यावर दोन ड्रिंक्स झाल्या तर मात्र हो! म्हणजे असं काही बनून जायचो की लोकांना मी तसा पाहवत नव्हतो. दोन तीन ड्रिंक्स नंतर मला काहीच फरक पडत नसायचा. आता मात्र तसे अजिबात होत नाही. ही जुन्या दिवसांची गोष्ट आहे". विराटचे हे उत्तर ऐकून अनुष्का देखील चकित झाली आणि तिला हसू फुटले.
विराट सध्या बंगळुरूमध्ये आहे. सध्या तो त्याचा आयपीएल संघ रॉयल चेलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) सोबत आगामी सीजनच्या तयारीमध्ये गुंतला आहे. फ्रेंचाईजी ने रविवारी आरसीबी अनबॉक्स इवेंट आयोजित केला होता. त्यादरमान आरसीबी ने संघाची नवीन जर्सी लॉंच केली. या कार्यक्रमांत आरसीबीचे दोन माजी दिग्गज खेळाडू क्रिस गेल आणि एबी डिविलियर्स देखील उपस्थित होते. आरसीबी 2 एप्रिल रोजी घरगुती मैदान एम. चिन्नास्वामी स्टेडियम मधून मुंबई इंडियन्स विरुद्ध आपल्या आयपीएलच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे.