मुंबई: विराट कोहली (Virat Kohli) मैदानावर आपल्या आक्रमक अंदाजासाठी ओळखा जातो. त्यातही जर विरोधी संघातील खेळाडूंने डोळे वर केले तर त्याला प्रत्युत्तर देण्यास विराट नेहमीच तयार असतो. विराट कोहली सध्याच्या घडीला कोणत्याही फॉरमॅटचा कर्णधार(captain) नाही मात्र त्यानंतरही मैदानावरील त्याचा आक्रमक स्वभाव(behaviour) काही बदललेला नाही. virat Kohli rift with south Africa captain Temba bavuma during first one day match
भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यादरम्यान मैदानावर विराट कोहली(virat kohli) आणि आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा यांच्यात शाब्दिक बाचाबाची पाहायला मिळाली. खरतरं, द.आफ्रिकेच्या फलंदाजीदरम्यान ३६व्या ओव्हरमध्ये युझवेंद्र चहलच्या बॉलवर टेम्बा बावुमाने कव्हरच्या दिशेने शॉट मारला होता तेथे फिल्डिंग करत असलेल्या कोहलीने लगेचच बॉलवर झडप घातली आणि बॉल सरळ स्टम्पच्या दिशेने थ्रो केला.
विराट कोहलीने जो थ्रो केला तो बॉल टेम्बा बावुमाच्या तोंडाजवळून गेला. अशातच बावुमाला हा बॉल लागला असता. तो नशीबाने वाचला. दरम्यान, यानंतर विराट कोहलीला त्याने काहीतरी म्हटले. यानंतर मागे सरेल तो कोहली कसला. त्याने टेम्बा बावुमाला सडेतोड उत्तर दिले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या सामन्यात टेम्बा बावुमाने ११० धावांची खेळी केली होती. एक वेळ अशी होती की भारताने या सामन्यात द. आफ्रिकेवर आपली पकड मजबूत केली होती. मात्र ६८ धावांवर ३ बळी गमावलेल्या आफ्रिकेच्या संघाने २९६ धावांचा मोठा स्कोर उभा केला. ६८ धावांवर ३ विकेट पडल्यानंतरही टीम इंडियाला आफ्रिकेवर दबाव राखता आला नाही. द. आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमान(११०) आणि रासी वाड डेर डुसैन(नाबाद १२९) यांच्यात चौथ्या विकेटसाठी २०४ धावांची भागीदारी झाली.