२०१५ च्या वर्ल्ड कपनंतर विराट कोहली- रोहित शर्मा सुसाट

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated May 20, 2019 | 22:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

World cup 2019: ऑस्ट्रेलियामध्ये संपन्न झालेला २०१५ च्या वर्ल्ड कपनंतर विराट कोहलीनं बरेच रेकॉर्ड्स मोडले आणि  वन-डे आणि टेस्टमध्ये नंबरचा १ बॅट्समन बनला आहे. तर रोहित शर्मा ही यात काही मागे नाही आहे. 

virat Kohli and rohit sharma
२०१५ च्या वर्ल्ड कपनंतर विराट कोहली- रोहित शर्मा सुसाट  |  फोटो सौजन्य: AP, File Image

Rohit sharma and virat kohli world cup records: टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीचा करिअर ग्राफ २०१५ वर्ल्ड कपनंतर वाढतच गेला. गेल्या चार वर्षांत कोहलीनं कोणता रेकॉर्ड ब्रेक केला नाही हे बोलणं चुकीचं ठरेल. आता पहिल्यांदा विराट कोहली २०१९ चा वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. सक्रिय खेळाडूंच्या बाबतीत बोलायचं झाल्यास 'रन मशीन'च्या नावानं प्रसिद्ध विराट कोहली वन-डेमध्ये सर्वांत जास्त शतक करणारा बॅट्समन आहे. 

कोहलीजवळ मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या ४० शतक मोडण्याचा रेकॉर्ड आहे. गेल्या वर्षी विराट कोहलीनं इतिहास रचला होता. विराट आयसीसी क्रिकेटर ऑफ द ईयरसाठी सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी जिंकणारा पहिला खेळाडू बनला होता. यासोबतच विराटनं आयसीसी पुरूष टेस्ट प्लेअर ऑफ द ईयर आणि आयसीसी वन-डे प्लेअर ऑफ द ईयरचा अॅवॉर्ड आपल्या नावावर केला.

२०१५ ला वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा प्रवास सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळताना समाप्त झाला होता. त्यानंतर विराट कोहलीनं वन-डेमध्ये ४३०६ रन केले. या चार वर्षांत ३० वर्षीय कोहलीनं १९ वन-डे शतक केले. तर गेल्या चार वर्षांत वन-डेमध्ये सर्वांत जास्त रन करणारा बॅट्समन बनला आहे. 

विराट कोहलीनंतर वन-डे मध्ये गेल्या चार वर्षांत सर्वांत जास्त रन करणारा दुसरा खेळाडू म्हणजे बॅट्समन रोहित शर्मा.  हिटमॅननं गेल्या चार वर्षांत ६१.१२ च्या सरासरीनं आणि १४ शतकांच्या मदतीनं ३७९० रन केले. रोहितनं यावेळी (२०८*) एक दुहेरी शतक केले आणि इतिहासात आपल्या नावाचा समावेश केला. भारतीय ओपनर जगतात एकमात्र असा बॅट्समन आहे, ज्यानं वन-डेच्या इतिहासात तीन द्विशतक करण्याची कमाल दाखवली. 

इंग्लंडचा टेस्ट कॅप्टन जो रूट या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. गेल्या ४ वर्षांत रूटनं वन-डेमध्ये ५८.३० च्या सरासरीनं ३४९८ रन बनवले. रूटनं पाकिस्तानविरोधात काही दिवसांपूर्वीच झालेल्या वन-डे सीरिजमध्ये चांगल प्रदर्शन केलं आणि याच लयात ३० मे रोजीपासून सुरू होणाऱ्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ मध्ये जारी ठेवणार आहे. 

रूटचा सहकारी आणि इंग्लंडचा कॅप्टन इयोन मोर्गन गेल्या चार वर्षांत वन-डेमध्ये सर्वांत जास्त रन बनवणाऱ्या बॅट्समनच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. इयोननं ४६.७५ च्या सरासरीनं ३०३९ रन बनवले. या यादीत पाचव्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर बॅट्समन क्विंटन डी कॉक आहे. २६ वर्षीय डावखुऱ्या बॅट्समननं ५०.३१ च्या सरासरीनं २९७१ रन केले. यावेळी त्यानं ८ शतक आणि १६ अर्धशतक केले. 

२०१५ वर्ल्ड कपनंतर सर्वांत जास्त वन-डेमध्ये रन करणाऱ्या बॅट्समनची यादी 

 

  1. विराट कोहली (भारत) : 4306 रन
  2. रोहित शर्मा (भारत) : 3790 रन
  3. जो रूट (इंग्लंड) :  3498 रन
  4. इयोन मोर्गन (इंग्लंड) : 3039 रन
  5. क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका) : 2971 रन

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
२०१५ च्या वर्ल्ड कपनंतर विराट कोहली- रोहित शर्मा सुसाट Description: World cup 2019: ऑस्ट्रेलियामध्ये संपन्न झालेला २०१५ च्या वर्ल्ड कपनंतर विराट कोहलीनं बरेच रेकॉर्ड्स मोडले आणि  वन-डे आणि टेस्टमध्ये नंबरचा १ बॅट्समन बनला आहे. तर रोहित शर्मा ही यात काही मागे नाही आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola