Team India: टीम इंडियाच्या या टॉप बॅट्समनचा लाजिरवाणा रेकॉर्ड

Team India: टीम इंडिया विरूद्ध न्यूझीलंड यांचा सेमीफायनल सामना सुरू आहे. या सामन्यादरम्यान टीम इंडियाच्या टॉप ३ बॅट्समननी लाजिरवाणा रेकॉर्ड केला आहे. असा रेकॉर्ड वनडे क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा झाला

Indian Batsman
Team India: टीम इंडियाच्या या टॉप बॅट्समनचा लाजिरवाणा रेकॉर्ड  |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

  • टीम इंडियाच्या बॅट्समनचा लाजिरवाणा रेकॉर्ड
  • रोहित, विराट, राहुल एक-एक धावा करून आऊट
  • रोहित शर्माही सेमीफायनलमध्ये फेल

मॅन्चेस्टरः वर्ल्ड कप २०१९ च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये पावसाच्या व्यत्ययामुळे सामना पहिल्या दिवशी रद्द झाला. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी भारत विरूद्ध न्यूझीलंडच्या सेमीफायनलच्या सामन्यात टीम इंडियाच्या बॉलर्संनी कीवीच्या टीमना २२९ वर थांबवले. त्यानंतर बॅटींग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाची सुरूवात एकदम खराब झाली. कीवीच्या बॉलर्संनी टीम इंडियाच्या बॅट्समनना अक्षरशः रडवलं. न्यूझीलंडच्या बॉलर्संनी चार ओव्हरमध्ये टीम इंडियाच्या तीन विकेट्स घेतल्या. टीम इंडियाला पहिला झटका हा दुसऱ्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर मॅट हेनरीनं घेतला. रोहित शर्मा हेनरीच्या बॉलवर विकेट किपर टॉम लॅथमनं कॅच घेतली. वर्ल्ड कपमध्ये पाच शतक करणाऱ्या रोहितनं केवळ  १ धावा केल्या. 

रोहित आऊट झाल्यानंतर बॅटिंग करण्यासाठी आलेला कॅप्टन विराट कोहली तिसऱ्या ओव्हरमध्ये ट्रेंट बोल्टच्या बॉलवर एलबीडब्ल्यू झाला. कोहलीनं फिल्ड अंपायरच्या निर्णयाचा वापर केला. मात्र अंपायर्स कॉलमुळे विराट पॅव्हेलियनमध्ये परतला. विराटनं देखील केवळ १ धावा केल्या. त्यानंतर चौथ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर हेनरीनं टीम इंडियाला तिसरा झटका दिला. केएल राहुल सुद्धा हेनरीच्या बॉलवर आऊट झाला. विकेटकीपर लॅथमनं कॅच पकडली. लोकेशनं सुद्धा १ धावा केल्या. 

विराट, रोहित आणि राहुल पॅव्हेलियनमध्ये जाणं हे भारतासाठी खूप मोठा धक्का होता. एका मागोमाग तीन टॉपचे बॅट्समन एक- एक धावाकरून पॅव्हेलियनमध्ये परतले. हा रेकॉर्ड टीम इंडियाच्या तीन बॅट्समनच्या नावावर वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सारख्या सामन्यात होणं हे खूप लाजिरवाणं आहे. 

रोहितनं ब्रेक केले अनेक रेकॉर्ड 

रोहित शर्मा हा या वर्ल्ड कपमध्ये कोणत्यातरी टीमकडून तीन शतक करणारा पहिला बॅट्समन ठरला आहे. रोहितनं हा रेकॉर्ड शनिवारी श्रीलंकाविरूद्ध शतक केल्यानंतर आपल्या नावावर केला. रोहितनं श्रीलंकाविरूद्ध खेळताना १०३ रन केले. रोहितनं याव्यतिरिक्त यंदाच्या टूर्नामेंटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळताना १२२ ची नाबाद खेळी केली. त्यानंतर इंग्लंडविरूद्ध खेळताना १०२ रन केले. तर रोहित शर्मा हा खेळताना शतक करणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या नंबरवर पोहोचला आहे. रोहितच्या पुढे सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली असून त्यांच्या नावावर क्रमशः १७ आणि २५ शतक आहेत. 

रोहितनं श्रीलंकेविरूद्ध खेळताना बरेच रेकॉर्ड आपल्या नावावर केले. श्रीलंके विरूद्धच्या सामन्यातले शतक हे या वर्ल्ड कपमधले ५ शतक होतं. तसंच रोहित एका वर्ल्ड कपमध्ये सर्वांत जास्त शतक करणारा बॅट्समन बनला आहे. त्यानं श्रीलंकेचा माजी बॅट्समन कुमार संगाकाराला ही मागे टाकलं आहे. संगाकाराच्या नावावर एका वर्ल्ड कपमध्ये चार शतकाचा रेकॉर्ड आहे. रोहितनं या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकाविरूद्ध १२२, पाकिस्तानविरूद्ध १४०, इंग्लंडविरूद्ध १०२ आणि बांग्लादेशविरूद्ध १०४ रनची खेळी केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Team India: टीम इंडियाच्या या टॉप बॅट्समनचा लाजिरवाणा रेकॉर्ड Description: Team India: टीम इंडिया विरूद्ध न्यूझीलंड यांचा सेमीफायनल सामना सुरू आहे. या सामन्यादरम्यान टीम इंडियाच्या टॉप ३ बॅट्समननी लाजिरवाणा रेकॉर्ड केला आहे. असा रेकॉर्ड वनडे क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा झाला
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola