VIDEO: कोहलीने सांगितला शेवटच्या बॉलचा 'तो' किस्सा

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 25, 2022 | 14:53 IST | टाइम्स नाऊ मराठी

Virat Kohli: भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी टी20 वर्ल्डकप 2022 मध्ये पाकिस्तानविरुद्ध रोमहर्षक विजय मिळवला. भारताच्या विजयाच्या वेळी विराट कोहली आणि रवीचंद्रन अश्विन क्रीझवर होते. 

virat kohli
VIDEO: कोहलीने सांगितला शेवटच्या बॉलचा 'तो' किस्सा 
थोडं पण कामाचं
  • भारताला हाय वोल्टेज सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 16 धावांची गरज होती.
  • ही ओव्हर ऑलराऊंडर मोहम्मद नवाजने टाकली.
  • भारताने ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर विजय मिळवला.

मुंबई: टीम इंडियाने(team india) टी20 वर्ल्डकप 2022(t-20 world cup 2022) मध्ये पाकिस्तानला(pakistan) 4 विकेटनी मात दिली. सामन्याच्या शेवटच्या क्षणी सातत्याने समीकरणे बदलत होती. भारताला शेवटच्या बॉलवर विजय मिळवता आला. दिग्गज स्पिनर रवीचंद्रन अश्विनने विजयी धाव घेतली. तर दुसऱ्या बाजूला विराट कोहली उपस्थित होता. कोहलीने 53 बॉलमध्ये 6 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 82 धावा केल्या आणि प्लेयर ऑफ दी मॅचचा खिताब मिळवला. रोमहर्षक सामना संपल्यानंतर कोहलीने अश्विनचे कौतुक करताना शेवटच्या बॉलचा किस्सा सांगितला. त्याने सोबतच सांगितले की अश्विनने कव्हर्सच्या वर शॉट खेळण्याची गोष्ट ऐकली नाही. virat kohli says about incident of last ball in match

अधिक वाचा - दरीत अडकलेला बैल 25 दिवसांनी सुरक्षित बाहेर काढला

भारताला हाय वोल्टेज सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 16 धावांची गरज होती. ही ओव्हर ऑलराऊंडर मोहम्मद नवाजने टाकली. नवाजने पहिल्या बॉलवर हार्दिक पांड्याला बाद केले. तर पाचव्या बॉलवर दिनेश कार्तिकला स्टम्प आऊट केले. यानंतर अश्विन बॅटिंगसाठी उतरला. भारताला शेवटच्या बॉलवर 2 धावांची गरज होती. अशातच नवाजने वाईड बॉल टाकला. आणि नंतर अश्विनने मिड ऑफच्या खेळाडूच्या वरून शॉट खेळत एक धाव घेतली. यामुळे भारताला विजय साकारता आला. 

डोक्याच्यावर डोके लावले

कोहलीने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले, जेव्हा तुम्हाला 15-16 धावांचा रनरेट हवा असेल आणि जेव्हा गोष्ट 2 बॉलमध्ये 2 धावांवर आली असेल तेव्हा लोक रिलॅक्स होतील अथवा ओव्हरएक्सायटेड होती की चला झाले. मात्र त्यानंतर कार्तिक बाद झाला. मी अश्विनला सांगितले की तु कव्हर्सच्या वर मारण्याचा प्रयत्न कर. मात्र त्याने डोक्याच्या वर डोके लावले. ते खूप बहादुरपणाचे काम होते. तो लाईनवरून दूर झाला आणि वाईड केला. यानंतर अशी स्थिती आली की बॉल जर गॅपमध्ये गेला तर आपण जिंकू. 

अधिक वाचा - दिवाळी सणाच्यावेळी वडोदरात उसळली जातीय दंगल

विशेष म्हणझे, पाकिस्तानविरुद्ध भारताची सुरूवात खराब झाली होती. भारताने 31 धावांवर 4 विकेट गमावले होते. अशा कठीण परिस्थितीत चेस मास्टर कोहलीने संघाचा मोर्चा सांभाळला. त्याने हार्दिकसोबत पाचव्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी निर्णायक ठरली. भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या कोहलीने हार्दिकसोबत शानदार भागीदारी केली. तो म्हणाला हार्दिकने मला विश्वास ठेवण्यास सांगितले होते. तो म्हणाला होतो की जर आपण शेवटपर्यंत टिकलो तर सामना जिंकू. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी