T20 WC:आम्ही स्वप्न पूर्ण नाही करू शकलो मात्र...विराटने लिहिले असे काही...

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 11, 2022 | 12:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

virat kohli: स्टार फलंदाज विराट कोहली इंग्लंडविरु्धच्या टी20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये अर्धशतक ठोकले. तसेच टीम इंडियाला 160 पार धावसंख्या उभारण्यात मदत केली. 

virat kohli
आम्ही स्वप्न पूर्ण नाही करू शकलो मात्र...विराटने लिहिले असे  
थोडं पण कामाचं
  • ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेड ओव्हल मैदानावर भारतीय संघाला इंग्लंडच्या हातून 10 विकेटनी पराभव सहन करावा लागला.
  • भारतीय संघाने ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आणि जबरदस्त विराट कोहलीच्या जोरावर 6 विकेट गमावताना 168 धावा केल्या.
  • यानंतर इंग्लंडने कोणतीही विकेट न गमावता हे आव्हान पूर्ण केले. 

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि जबरदस्त फलंदाज विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध टी20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये मिळालेल्या पराभवानंतर आपल्या मनातली गोष्ट दिली. विराटच्या शब्दांवरूनच अंदाज लावता येऊ शकतो की तो किती निराश आणि भावूक होत मायदेशी परतत आहे. भारताला गुरूवारी अॅडलेडच्या ओव्हल मैदानावर खेळवण्यात आलेल्या स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडच्या हातून 10 विकेटनी पराभव पत्करावा लागला. यासोबतच इंग्लंडने फायनलचे तिकीट मिळवले. येथे त्यांचा सामना 13 नोव्हेंबरला पाकिस्तानशी होणार आहे. virat kohli says emotional after defeat against england 

अधिक वाचा - पंडित नेहरूंच्या जन्मदिनी का साजरा होतो बालदिन?

अॅडलेडमध्ये निराशाजनक पराभव

ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेड ओव्हल मैदानावर भारतीय संघाला इंग्लंडच्या हातून 10 विकेटनी पराभव सहन करावा लागला. भारतीय संघाने ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आणि जबरदस्त विराट कोहलीच्या जोरावर 6 विकेट गमावताना 168 धावा केल्या. हार्दिकने 33 बॉलमध्ये 63 धावांची खेळी केली तर विराटने 40 बॉलमध्ये 50 धावांची खेळली केली. यानंतर इंग्लंडने कोणताही विकेट न गमावता हे आव्हान पूर्ण केले. 

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली इतर क्रिकेट प्रेमींसारखाच निराश पाहायला मिळायला. त्याने ट्विटरवर संघासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. यात सर्व खेळाडू राष्ट्रगीतासाठी उभे असल्याचे दिसत आहेत. विराटने लिहिले, आम्ही आमचे स्वप्न पूर्ण केल्याशिवायच निराशेसह ऑस्ट्रेलिया सोडत आहोत. मात्र आम्ही एका ग्रुपमधील सामन्यातून अनेक अविस्मरणीय क्षण घेऊन जात आहोत. आम्ही यापेक्षा चांगले काहीतरी करू असे लक्ष्य ठेवत आहोत. 

विराटने चाहत्यांना केले धन्यवाद

या फलंदाजाने पुढे लिहिले, आम्ही सर्व चाहत्यांचे आभार मानतो जे स्टेडियममध्ये आम्हाला समर्थन देण्यासाठी मोठ्या संख्येने आले. ही जर्सी घालून देशाचे प्रतिनिधित्व करताना गर्व वाटतो. विराटने या स्पर्धेत आपल्या फलंदाजीने कमाल दाखवली. त्याने 6 डावांत 296 धावा केल्या. यात चार अर्धशतकांचा समावेश आहे. 

अधिक वाचा - वास्तुशी संबंधित 'हे' 5 उपाय केल्यास घरात येते समृद्धी

भारताने इतका स्कोर करणे होते गरजेचे

भारताच्या पराभवाबद्दल बोलताना राहुल द्रविडने सांगितले, भारताने या सामन्यात 180 ते 185चा स्कोर करायला हवा होता. तसेच इंग्लंडने प्रत्येक विभागात त्यांच्यावर मात केली. आमचा संघ असा आहे ज्यांनी स्पर्धेत दोन ते तीन वेळा  180 अथवा त्यापेक्षा जास्त स्कोर केला. जेव्हा आम्ही सुरूवात केली तेव्हा मुलांनी सांगितले की पिच चिकचिकीत आणि धीमी होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी