IND vs PAK: विराट कोहली करणार मोठी ऐतिहासिक कामगिरी

100 matches in all Formats : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली रविवारी २८ ऑगस्ट २०२२ रोजी पाकिस्तान विरुद्ध खेळण्यासाठी मैदानात येताच मोठा पराक्रम करणार आहे.

Virat Kohli set to become second cricketer in world to play 100 matches in all Formats
विराट कोहली करणार मोठी ऐतिहासिक कामगिरी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • विराट कोहली करणार मोठी ऐतिहासिक कामगिरी
  • पाकिस्तान विरुद्ध खेळण्यासाठी मैदानात येताच मोठा पराक्रम करणार
  • आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये १०० मॅचचा टप्पा ओलांडणार

100 matches in all Formats : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली रविवारी २८ ऑगस्ट २०२२ रोजी पाकिस्तान विरुद्ध खेळण्यासाठी मैदानात येताच मोठा पराक्रम करणार आहे. तो आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये १०० मॅचचा टप्पा ओलांडणार आहे. ही कामगिरी करणारा विराट कोहली हा जगातील दुसरा क्रिकेटपटू होणार आहे. याआधी ही कामगिरी रॉस टेलर याने फेब्रुवारी २०२० मध्ये केली.

टेस्ट (कसोटी), वन डे (एकदिवसीय), टी ट्वेंटी (२०-२० षटकांचे सामने) या तीन प्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवर १०० मॅचचा टप्पा ओलांडणारा न्यूझीलंडचा रॉस टेलर हा जगातील पहिला क्रिकेटपटू आहे. आता या यादीत विराट कोहलीच्या रुपाने दुसऱ्या खेळाडूचा समावेश होणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये १०० मॅचचा टप्पा ओलांडणार विराट कोहली हा पहिला भारतीय क्रिकेटपटू आहे. 

आंतरराष्ट्रीय टी २० या प्रकारात भारताचा कॅप्टन रोहित शर्मा याने १०० मॅचचा टप्पा ओलांडला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय टी २० या प्रकारात १०० मॅचचा टप्पा ओलांडणारा विराट कोहली हा रोहित शर्मा नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा भारतीय फलंदाज ठरणार आहे.

आतापर्यंत रोहित शर्मा याच्यासह १३ क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय टी २० या प्रकारात १०० मॅचचा टप्पा ओलांडला आहे. या यादीत विराट कोहलीच्या रुपाने १४व्या खेळाडूचा समावेश होणार आहे.

विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय पातळीवर आतापर्यंत १०२ टेस्ट मॅच, २६२ वन डे मॅच आणि ९९ टी २० मॅच खेळल्या आहेत. कोहलीने आंतरराष्ट्रीय टी २० या प्रकारात झिम्बाब्वे विरुद्ध २०१० मध्ये पदार्पण केले. त्याला १००व्या आंतरराष्ट्रीय टी २० मॅचचा टप्पा गाठण्यासाठी तब्बल १२ वर्षांचा कालावधी लागला. या कालावधीत तो आयपीएलच्या माध्यमातून अनेक मॅच खेळला.

विराट कोहलीने ९९ आंतरराष्ट्रीय टी २० मॅचमध्ये ५०.१२च्या सरासरीने १३७.६६च्या स्ट्राइक रेटने ३३०८ धावा केल्या. यात ३० अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद ९४ धावा ही विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय टी २० प्रकारातील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. जर विराट कोहलीने पाकिस्तान विरुद्ध आशिया कप स्पर्धेत खेळताना टी २० मॅचमध्ये शतक केले तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये शतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दाखल होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी