Virat Kohli shared VIDEO On Instagram: Virat Kohli ने अनुष्का-वामिकासोबत सुट्टीच्या मूडमध्ये; चाहत्यांसाठी खास Recap Reel शेअर

Virat is celebrating holidays: विराटनं पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत (Bollywood actress Anushka Sharma) एक रीकॅप रील शेअर केला.

Virat Kohli And Anushka Sharma
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • विराट कोहली (Team India cricketer Virat Kohli) इन्स्टाग्रामवर (Instagram) खूप Active असतो.
  • सध्या विराट कोहली आपल्या कुटुंबियांसोबत सुट्टीचा आनंद घेत आहे.
  • नुकताच त्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून (Official Instagram Account) एक व्हिडिओ शेअर केला आहे.

नवी दिल्ली:  Virat Kohli’s Recap Reel: टीम इंडियाचा क्रिकेटर विराट कोहली (Team India cricketer Virat Kohli)  इन्स्टाग्रामवर  (Instagram) खूप Active असतो. सध्या विराट कोहली आपल्या कुटुंबियांसोबत सुट्टीचा आनंद घेत आहे.  नुकताच त्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून (Official Instagram Account) एक व्हिडिओ शेअर केला आहे. गुरुवारी विराटनं पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत (Bollywood actress Anushka Sharma) एक रीकॅप रील शेअर केला. या व्हिडिओमध्ये तो पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकासोबत खेळताना दिसत आहे. इतकंच नाही तर या व्हिडिओमध्ये तो आपल्या कुत्र्यासोबत आणि काही ठिकाणी आपल्या लहान मुलीसोबत वेळ घालवताना दिसत आहे.

काय आहे रिकॅप रिलमध्ये 

या रिलमध्ये तो खूप मस्ती करताना दिसतोय. रिलमध्ये असलेल्या काही फोटोंमध्ये तो आपल्या कुत्र्यासोबत खेळताना दिसत आहे तर काहींमध्ये तो आपल्या मुलीवर प्रेम करताना दिसत आहे. विराट आणि अनुष्का कधीच आपल्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत नाहीत. त्यामुळे या व्हिडिओमध्येही त्यांनी आपल्या मुलीचा चेहरा दाखवलेला नाही. इतकेच नाही तर अनेकवेळा त्याने फोटोग्राफर्सना आपल्या मुलीचा फोटो काढण्यासही नकार दिला आहे. विरुष्काचं असं म्हणणं आहे की, आपल्या मुलीला पूर्ण स्वातंत्र्यात जगण्याची संधी द्यायची आहे. तिला जिथे पाहिजे तिथे जावं. म्हणूनच आम्ही तिचे फोटो जास्त शेअर न करण्याचा प्रयत्न करतो.

अधिक वाचा-  रणवीर सिंहच्या 'या' फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग

जवळजवळ चार वर्षे डेटिंग केल्यानंतर कोहली आणि अनुष्काने 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीमध्ये लग्न केले. 2020 मध्ये कोविड-19 महामारी दरम्यान या कपलनं सोशल मीडियावर प्रेग्नेंसीबद्दल जाहीर केलं. जानेवारी 2022 मध्ये अनुष्कानं मुलीला जन्म दिला जिचं नाव वामिका ठेवण्यात आलं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

इंग्लंडविरुद्धच्या सिरीजनंतर विराट कोहलीने टीम इंडियाकडून काही दिवस विश्रांती घेतली आहे.  अनुष्का शर्माच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अनुष्का पुढे प्रोसिट रॉयच्या 'चकडा एक्सप्रेस'मध्ये दिसणार आहे.

हा सिनेमा माजी भारतीय क्रिकेटपटू झुलन गोस्वामी यांच्या जीवनावर आधारित स्पोर्ट्स बायोपिक सिनेमा आहे, जो केवळ नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी