Virat Kohli Video Call : भारतीय संघाच्या बसमधून विराट कोहलीनं चाहत्यांना दाखवला 'या' अभिनेत्रीचा व्हिडिओ

Virat Kohli Video Call :  अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा क्रिकेटर पती विराट कोहली हे सर्वात आवडते सेलिब्रिटी जोडप्यांपैकी एक आहेत आणि चाहते त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत.  सध्या कोहलीचा संघातील बसमधील एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली :  दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ( South Africa ) टी20 मालिकेतील पहिला सामना जिंकल्यानंतर विराट कोहली   ( Virat Kohli ) टीम बसमध्ये व्हिडिओ कॉलवर ( Video call) होता. फोनवर बोलत असताना विराट दिसला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.  ( Virat Kohli showed the video of this actress to the fans from the Indian team bus)

अधिक वाचा  : या 4 राशींचे बदलणार नशीब, पाहा त्यात तुमची आहे का रास

 अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा क्रिकेटर पती विराट कोहली हे सर्वात आवडते सेलिब्रिटी जोडप्यांपैकी एक आहेत आणि चाहते त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत.  सध्या कोहलीचा संघातील बसमधील एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.  दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या भारतीय संघाच्या सामन्यानंतर विराट टीम बसमधून परतत असताना एका चाहत्याने त्याला पत्नी अनुष्काशी व्हिडिओ कॉलवर बोलताना पाहिले.  

अधिक वाचा  : रुग्णवाहिकेसाठी PM मोदींनी थांबवला त्यांचा ताफा

भारतीय संघाची बस जेव्हा चाहत्यांपासून जात होती. तेव्हा विराट कोहली  पत्नी अनुष्काशी व्हि़डिओ कॉलवर बोलत होता. भारतीय संघाची बस जवळ येताच  नागरिकांना विजयी घोषणा देण्यास सुरुवात केली. कोहलीने त्यांनी दुहेरी ट्रीट दिली. ते म्हणजे, कोहली अनुष्काशी व्हि़डिओ कॉलवर बोलत होता. चाहत्या जवळ बस पोहचताच विराटने आपल्या मोबाईलची स्क्रीन चाहत्यांकडे फिरवली. चाहत्यांना विराटसह अनुष्काही दिसली. व्हिडिओ कॉलमध्ये अनुष्काला पाहून चाहत्यांनी आनंदाने उड्या मारल्या.  
#TimesNowNavbharatOriginals #ViratKohliViralVideoCall #ViratAnushkaViralVideoCall

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी