Virat Kohli : भारत पाकिस्तान मॅचआधी विराट कोहलीचा धक्कादायक गौप्यस्फोट

Virat Kohli speak about mental health before Asia Cup 2022 India Vs Pakistan T20 Match : आशिया कप क्रिकेट स्पर्धेत आज (रविवार २८ ऑगस्ट २०२२) भारत आणि पाकिस्तान हे क्रिकेटमधील परंपरागत प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर असतील. ही मॅच सुरू होण्याच्या काही तास आधी विराट कोहलीने गौप्यस्फोट केला

Virat Kohli speak about mental health before Asia Cup 2022 India Vs Pakistan T20 Match
भारत पाकिस्तान मॅचआधी विराट कोहलीचा धक्कादायक गौप्यस्फोट  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • भारत पाकिस्तान मॅचआधी विराट कोहलीचा धक्कादायक गौप्यस्फोट
  • मानसिकदृष्ट्या खचलेला कोहली
  • महिनाभर बॅटला हात लावलेला नाही : विराट कोहली

Virat Kohli speak about mental health before Asia Cup 2022 India Vs Pakistan T20 Match : आशिया कप क्रिकेट स्पर्धेत आज (रविवार २८ ऑगस्ट २०२२) भारत आणि पाकिस्तान हे क्रिकेटमधील परंपरागत प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर असतील. आशिया कप स्पर्धेतील सर्वाधिक उत्सुकता असलेल्या या मॅचचे थेट प्रक्षेपण भारतीय वेळेनुसार रविवार २८ ऑगस्ट २०२२ रोजी संध्याकाळी ७.३० पासून सुरू होईल. ही मॅच सुरू होण्याच्या काही तास आधी भारताचा प्रमुख फलंदाज विराट कोहली याने मोठा गौप्यस्फोट केला. विराट कोहलीच्या गौप्यस्फोटामुळे अनेक क्रिकेटप्रेमी धास्तावले आहेत. प्रत्यक्ष मॅचमध्ये काय होणार असा प्रश्न त्यांना सतावत आहे.

मानसिकदृष्ट्या खचलो होतो असे विराट कोहली म्हणाला. महिनाभर बॅटला हात लावलेला नाही. मानसिक दुर्बलतेच्या काळात उसने अवसान दाखवले; असेही विराट कोहलीने सांगितले. शरीर थकले होते, विश्रांती घ्यावी असा आवाज आतून येत होता. यामुळेच इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे या तीन देशांच्या दौऱ्यावर गेलो नव्हतो, असे विराट कोहली म्हणाला.

विराट कोहलीने शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक कोलकाता येथे २०१९ मध्ये झालेल्या बांगलादेश विरुद्धच्या कसोटीत केले होते. आता तर त्याचे संघातील स्थान डळमळीत झाल्याची चर्चा अधूनमधून होत असते. कोहलीने कॅप्टन हे पद पण गमावले आहे. विराट कोहली आधी भारताचे आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या आयपीएल टीमचे नेतृत्व करत होता. आता या दोन्ही टीममध्ये तो कॅप्टन नाही तर एक साधा खेळाडू आहे. या पार्श्वभूमीवर विराट कोहली आशिया कपमध्ये काय कामगिरी करणार असा प्रश्न चर्चिला जात आहे.

कोहली करू शकतो मोठी कामगिरी!

पाकिस्तान विरुद्ध खेळल्यास विराट कोहलीच्या नावावर नव्या मोठ्या कामगिरीची नोंद होणार आहे. तो आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये १०० मॅचचा टप्पा ओलांडणारा जगातील दुसरा क्रिकेटपटू ठरणार आहे. टेस्ट (कसोटी), वन डे (एकदिवसीय), टी ट्वेंटी (२०-२० षटकांचे सामने) या तीन प्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवर १०० मॅचचा टप्पा ओलांडणारा न्यूझीलंडचा रॉस टेलर हा जगातील पहिला क्रिकेटपटू आहे. या यादीत विराट कोहलीच्या रुपाने दुसऱ्या खेळाडूचा समावेश होईल. आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये १०० मॅचचा टप्पा ओलांडणार विराट कोहली हा पहिला भारतीय क्रिकेटपटू होईल. आंतरराष्ट्रीय टी २० या प्रकारात भारताचा कॅप्टन रोहित शर्मा याने १०० मॅचचा टप्पा ओलांडला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय टी २० या प्रकारात १०० मॅचचा टप्पा ओलांडणारा विराट कोहली हा रोहित शर्मा नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा भारतीय फलंदाज ठरेल. रोहित शर्मा याच्यासह १३ क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय टी २० या प्रकारात १०० मॅचचा टप्पा ओलांडला आहे. या यादीत विराट कोहलीच्या रुपाने १४व्या खेळाडूचा समावेश होईल. 

विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय पातळीवर आतापर्यंत १०२ टेस्ट मॅच, २६२ वन डे मॅच आणि ९९ टी २० मॅच खेळल्या आहेत. कोहलीने आंतरराष्ट्रीय टी २० या प्रकारात झिम्बाब्वे विरुद्ध २०१० मध्ये पदार्पण केले. त्याला १००व्या आंतरराष्ट्रीय टी २० मॅचचा टप्पा गाठण्यासाठी तब्बल १२ वर्षांचा कालावधी लागला. या कालावधीत तो आयपीएलच्या माध्यमातून अनेक मॅच खेळला.

विराट कोहलीने ९९ आंतरराष्ट्रीय टी २० मॅचमध्ये ५०.१२च्या सरासरीने १३७.६६च्या स्ट्राइक रेटने ३३०८ धावा केल्या. यात ३० अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद ९४ धावा ही विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय टी २० प्रकारातील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. जर विराट कोहलीने पाकिस्तान विरुद्ध आशिया कप स्पर्धेत खेळताना टी २० मॅचमध्ये शतक केले तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये शतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दाखल होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी