विराट कोहलीने टी-20 फॉरमॅटमध्ये आता 'या' बाबतीत हिटमॅनला टाकलं मागे 

Virat Kohli: टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि हिटमॅन रहित शर्मा यांच्यात रन्स सोबतच आणखी एका बाबतीत स्पर्धा सुरु असल्याचं पहायला मिळत आहे. या स्पर्धेत पुन्हा एकदा कॅप्टन विराट कोहलीने बाजी मारली आहे. 

virat kohli surpasses rohit sharma in catches see full list sports cricket news marathi
विराट कोहलीने टी-20 फॉरमॅटमध्ये आता 'या' बाबतीत हिटमॅनला टाकलं मागे  

थोडं पण कामाचं

  • विराट कोहलीने टी-20 आंतरराष्ट्रीय मॅचेसमध्ये रोहित शर्माला टाकलं मागे 
  • टी-20 आंतरराष्ट्रीय मॅचेसमध्ये सर्वाधिक कॅच घेणारा विराट कोहली बनला दुसरा भारतीय प्लेअर 
  • टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक कॅच घेणाऱ्यां भारतीय प्लेअर्सच्या यादीत सुरेश रैना अव्वल 

ऑकलंड: टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याने आतापर्यंत 80 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅचेस खेळत 2745 रन्स बनवले आहेत तर हिटमॅन रोहित शर्माने 106 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅचेसमध्ये 2648 रन्स बनवले आहेत. विराट कोहली याने रोहित शर्माला रन्ससोबतच आता आणखी एका बाबतीत मागे टाकलं आहे.

आतापर्यंत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात रन्समध्ये स्पर्धा सुरु होती ज्यामध्ये कॅप्टन विराट कोहलीने बाजी मारली. त्यानंतर आता रविवारी न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये विराट कोहलीने आणखी एक कारनामा केला आहे. या मॅचमध्ये विराट कोहली याने न्यूझीलंडच्या दोन बॅट्समनच्या कॅच घेतल्या आणि रोहित शर्माला मागे टाकलं. 

विराट कोहली याने टी-20 आंतरराष्ट्रीय मॅचेसमध्ये सर्वाधिक कॅचेस घेणाऱ्या भारतीय प्लेअर्समधील दुसऱ्या क्रमांक गाठला आहे. विराट कोहलीने टी-20 आंतरराष्ट्रीय मॅचेसमध्ये 41 कॅच घेतल्या आहेत. याबाबतीत विराट कोहलीने रोहित शर्माला मागे टाकलं आहे. रोहित शर्माने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 40 कॅचेस घेतल्या आहेत. 

भारतीय प्लेअर्समध्ये सर्वाधिक कॅच घेण्याचा रेकॉर्ड सुरेश रैना याच्या नावावर आहे. सुरेश रैना याने टी-20 आंतरराष्ट्रीय मॅचेसमध्ये 42 कॅचेस घेतल्या आहेत. या सीरिजमध्ये आता विराट कोहली हा अव्वल असलेल्या सुरेश रैनाचा रेकॉर्ड तोडेल अशी अपेक्षा अनेकजण करत आहेत. 

टी-20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक कॅच घेणारे भारतीय प्लेअर्स 

  1. सुरेश रैना - 42 कॅचेस 

  2. विराट कोहली - 41 कॅचेस 

  3. रोहित शर्मा - 39 कॅचेस 

न्यूझीलंडविरुद्धच्या सलग दुसऱ्या टी-20 मॅचमध्ये टीम इंडियाने 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. पाच मॅचेसच्या टी-20 सीरिजमध्ये टीम इंडियाने 2-0 ने आघाडी घेतली आहे. रविवारी झालेल्या दुसऱ्या टी-20 मॅचमध्ये न्यूझीलंडने प्रथम बॅटिंग करत 20 ओव्हर्समध्ये पाच विकेट्स गमावत 132 रन्स केल्या. त्यानंतर टीम इंडियाने हे आव्हान तीन विकेट्स गमावत गाठलं आणि विजय मिळवला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी