कोहलीने घातला इतका महागडा टीशर्ट, लोक म्हणाले EMIवर घ्यावा लागेल

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 23, 2022 | 14:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

Virat Kohli T-Shirt: जगातील दिग्गज फलंदाजांपैकी एक विराट कोहलीच्या बॅटिंगची जितकी चर्चा होत असते तितकीच चर्चा त्याच्या लाईफस्टाईलचीही होत असते. त्यालाही महागडी घड्याळे तसेच गाड्या आवडतात. 

virat kohli
कोहलीने घातला इतका महागडा टीशर्ट, किंमत ऐकून व्हाल हैराण 
थोडं पण कामाचं
  • 2008मध्ये विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
  • विराट कोहलीची गणना आजच्या जगात क्रिकेटच्या दुनियेतील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये केली जाते.
  • विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 24 हजारापेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

मुंबई: टीम इंडियाचा(team india) जबरदस्त फलंदाज विराट कोहली(virat kohli) मैदानावर कमाल करतोच मात्र मैदानाबाहेरही सतत त्याची चर्चा होत असते. देशातच नव्हे तर परदेशातही त्याचे मोठ्या प्रमाणात फॅन्स आहेत. तो जे काही फॉलो करतो त्याचे फॅन्स ते फॉलो करत असतात. त्याची लाईफस्टाईलही(lifestyle) खूप वेगळी आहे. तो महागड्या गाड्या तसेच घड्याळांचा शौकीन आहे. यातच त्याचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. यात तो एक खास टी शर्ट(t shirt) घातलेला दिसत आहे. हा हाताने शिवलेला आहे मात्र त्याच्या किंमती साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. virat kohli t shirt viral on social media

अधिक वाचा - पांढरे केस आणि दाढी पुन्हा होईल काळी

विराटने शेअर केला फोटो

विराट कोहलीने मंगळवारी एक फोटो शेअर केला यात तो हाताने शिवलेला शर्ट घातलेला दिसत आहे. यात अनेक रंग आहेत. अनेक युजर्सनी विराटच्या या लूकचे कौतुक केले आहे. तर काहींनी या शर्टची कंपनी तसेच किंमतही काढली. 

EMIवर घ्यावे लागेल?

विराटच्या या फोटोला आतापर्यंत लाखांपेक्षा अधिक युजर्सनी लाईक केले आहे. तर हजारोंनी रिट्वीट करण्यात आले आहे. काही युजर्सनी तर कमेंटमध्ये याच्या किंमतीही लिहिल्या आहेत. असा दावा करण्यात आला आहे की हे टी शर्ट 9999 रूपयांचे आहे. याशिवाय यावर ईएमआयचा पर्यायही दिला आहे. विराट कोहलीला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी आराम देण्यात आला आहे. 

24 हजारांपेक्षा जास्त धावा

2008मध्ये विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. विराट कोहलीची गणना आजच्या जगात क्रिकेटच्या दुनियेतील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये केली जाते. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 24 हजारापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याने 102 कसोटीत 8074, 262 वनडेत 12344 आणि 115 टी20 सामन्यांत 4008 धावा केल्या आहेत. 

अधिक वाचा - थंडीत भांडी घासणं जीवावर येतं?

यंदा फॉर्म गवसला

गेल्या काही वर्षात विराट कोहली अजिबात फॉर्मात नव्हता. 2019नंतर त्याने शतक ठोकलेले नव्हते. या वर्षी विराटला आपला जुना फॉर्म परत मिळाला. आशिया कपमध्ये त्याने आपला शतकांचा दुष्काळ संपवला. त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये नुकत्याच पार पडलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये विराटने जबरदस्त कामगिरी केली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी