virat kohli: विराट कोहली घेणार टी-२०मधून निवृत्ती, आयपीएलमध्ये खेळत राहणार - माजी क्रिकेटर

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 10, 2021 | 17:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

पाकिस्तानच्या टीव्ही चॅनेलवर मुश्ताकने सांगितले की मला असे वाटते की कोहली लवकरच आंतरराष्ट्रीय टी-२० मधून निवृत्ती घेईल. 

virat kohli
virat kohli: कोहली घेणार टी-२०मधून निवृत्ती,माजी क्रिकेटर 
थोडं पण कामाचं
  • एक कर्णधार म्हणून आयसीसी टी-२० वर्ल्डकप ही विराटची शेवटची स्पर्धा होती मात्र त्याला यात निराशा हाती आली
  • संघाने सुरूवातीचे दोन्ही सामने पाकिस्तानविरुद्ध आणि न्यूझीलंडविरुद्ध गमावले.
  • शेवटच्या तीन सामन्यांमध्ये त्यांनी अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाला हरवले. 

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने(team india captain virat kohli) आयसीसी टी-२० वर्ल्डकप(icc t-20 world cup) सुरू होण्याआधीच या फॉरमॅटमधून कॅप्टन्सी सोडण्याचे जाहीर केले होते. मंगळवारी त्याच्या जागी बीसीसीआयने(bcci) रोहित शर्माला(rohit sharma) टी-२०संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले. तो न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेद्वारे ही जबाबदारी सांभाळणार आहे. पाकिस्तानचे माजी क्रिकेटक मुश्ताक अहमदने विराटच्या टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती बद्दल म्हटले आहे. virat kohli will retire from international t-20cricket says former cricketer

पाकिस्तानच्या टीव्ही चॅनेलवर मुश्ताकने सांगितले, जेव्हा एखादा यशस्वी कर्णधार म्हणतो की त्याला नेतृत्व सोडायचे आहे याचा अर्थ ड्रेसिंग रूममध्ये आलंबेल नाही असा आहे. सध्याच्या घडीला भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये दोन ग्रुप दिसत आहेत. एक मुंबईचा ग्रुप आहे तर दुसरा दिल्लीचा. 

एक कर्णधार म्हणून आयसीसी टी-२० वर्ल्डकप ही विराटची शेवटची स्पर्धा होती मात्र त्याला यात निराशा हाती आली. संघाने सुरूवातीचे दोन्ही सामने पाकिस्तानविरुद्ध आणि न्यूझीलंडविरुद्ध गमावले. या दोन सामन्यांतील पराभवामुळे त्यांना सेमीफायनल गाठता आली नाही. शेवटच्या तीन सामन्यांमध्ये त्यांनी अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाला हरवले. 

मुश्ताक म्हणाले, मला असे वाटते की कोहली लवकरच टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेईल. तसे तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये आपल्या फ्रेंचायजी संघाकडून खेत राहील. मला वाटते की त्याने या फॉरमॅटमध्ये ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या केल्या आहेत. 

याआधी वर्ल्डकपदरम्यान माजी पाकिस्तानी क्रिकेट शोएब अख्तरनेही टीम इंडियाचे दोन भाग झाल्याचे बोलला होता. त्यांचे म्हणणे होते की विराटने स्पर्धेआधी कर्णधारपद सोडण्याचे जाहीर करून चूक केली. त्याला असे करायला नको होते. यामुळे त्याचा खेळाडूंमधील सन्मान कमी झाला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी