IND Vs NZ: विराट कोहलीला न्यूझीलंड नाही तर याची सतावतेय भीती

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 30, 2021 | 15:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

ICC T20 World Cup: विराट कोहलीचा संघ रविवार न्यूझीलंडविरुद्ध आपला दुसरा सामना खेळणार आहे. भारताला या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध पराभवास सामोरे जावे लागले होते. 

india vs new zealand
IND Vs NZ: कोहलीला न्यूझीलंड नाही तर याची सतावतेय भीती 
थोडं पण कामाचं
  • भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना दुबईच्या त्याच मैदानावर रंगणार आहे जिथे टीम इंडियाला पाकिस्तानने हरवले होते
  • येथे टॉस फॅक्टर महत्त्वाचा ठरला होता.
  • येथे लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला सातत्याने विजय मिळाला आहे.

मुंबई: आयसीसी टी-२० वर्ल्डकप(T20 World Cup)मध्ये रविवारी विराट कोहलीचा संघ(virat kohli team) न्यूझीलंडविरुद्ध(new zealand) मैदानात उतरत आहे. हा सामना टीम इंडियासाठी करो वा मरो इतका आहे. या सामन्यातील पराभवाचा अर्थ सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर जाणे आहे. पाकिस्तानविरुद्धच्या(pakistan) सामन्यात भारताला १० विकेटनी दारूण पराभवास सामोरे जावे लागले होते. विराट एक असा कर्णधार आहे ज्याला पुनरागमन करायचे आहे. टीमइंडियाकडे फॉर्म आणि रेकॉर्ड दोन्ही आहेत. मात्र विराटकडे एक गोष्ट नाही ती म्हणजे चांगले नशीब. हे आम्ही नाही तर विराट कोहलीचा रेकॉर्ड सांगत आहे. टॉसच्या बाबतीत विराट कोहलीचे नशीब चांगले नाही. virat Kohli worries about toss in India vs new Zealand match

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना दुबईच्या त्याच मैदानावर रंगणार आहे जिथे टीम इंडियाला पाकिस्तानने हरवले होते आणि येथे टॉस फॅक्टर महत्त्वाचा ठरला होता. येथे लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला सातत्याने विजय मिळाला आहे. येथे टी-२० वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत १० सामने खेळवण्यात आले आणि प्रत्येकवेळी लक्ष्याचा पाठलाग करणारा संघच विजय मिळवत आला आहे. अशातच टॉस जिंकणारा संघ पहिल्यांदा फिल्डिंग करणे पसंत करतो. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही हेच झाले. भारतीय संघ टॉस हरला आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. संध्याकाळी येथे दव पडत असल्याने गोलंदाजी करणे कठीण होते. 

सातत्याने टॉसमध्ये होतो पराभव

दरम्यान हे रेकॉर्ड त्या दिशेला इशारा करत आहेत की रविवारी विराट कोहली अथवा केन विल्यमसन्स यांच्यापैकी जे कोणी टॉस जिंकतील ते पहिल्यांदा बॉलिंग करणेच पसंत करतील. टॉस जिंकणे वा हरणे हा नशिबाचा खेळ आहे. माहीत नाही कधी फासा कोणाच्या बाजूने पडेल. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे की टॉसच्या बाबतीत विराट कोहलीचे नशीब चांगले नाही. जर रेकॉर्डवर नजर टाकली तर टी-२०, वनडे आणि कसोटीतील मागील १५ सामन्यांपैकी १४ सामन्यांत विराटला टॉस जिंकण्यात अपयश आले. सध्याच्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातही विराट टॉस हरला होता आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही हेच हाल होते. 

सर्वाधिक टॉस हरणारा कॅप्टन

गेल्या दोन वर्षाच्या रेकॉर्डवर नजर टाकली असता जानेवारी २०१९पासून ते आतापर्यंत विराट कोहली सगळ्यात जास्त टॉस हरणारा कर्णधार आहे. टी-२०, वनडे आणि कसोटीत सर्वाधिक वेळा ३५ सामन्यांमध्ये टॉस हरला आहे. या दरम्यान तो केवळ १३ सामन्यांमध्ये टॉस जिंकला आहे. या लिस्टमध्ये दुसऱ्या स्थानावर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आहे. तो २५ सामन्यांमध्ये टॉस हरला आहे. यानंतर इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनचा नंबर लागतो. तो १७ सामन्यांमध्ये टॉस हरला आहे. 

असा आहे इतिहास

टीम इंडिया टी-२० वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत एकदाही न्यूझीलंडविरुद्ध जिंकू शकलेला नाही. याशिवाय मोठ्या सामन्यांमध्ये त्यांना न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही. यात २०१९चा वर्ल्डकपची सेमीफायनल आणि या वर्षीच्या टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचा समावेश आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी