विराट कोहली जाहिरातीतून मिळणारे पैसे 'यांना' देणार देणगी

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 18, 2020 | 16:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली लवकरच पिता होणार आहे. कोहलीने सॅनिटायझेशन ब्रँड वाईजच्या प्रमोशनमधून मिळणारी रक्कम कुपोषित बालकांसाठी दान देण्याचे ठरवले आहे.

Virat Kohli's participation in the fight against malnutrition
विराट कोहलीचा कुपोषणाविरुद्धच्या लढाईत सहभाग  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली लवकरच पिता होणार आहे.
  • कोहलीने सॅनिटायझेशन ब्रँड वाईजच्या प्रमोशनमधून मिळणारी रक्कम कुपोषित बालकांसाठी दान देण्याचे ठरवले आहे
  • वाईजने अलीकडेच कोहलीची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली होती.

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली लवकरच पिता होणार आहे. आत्तापासूनच त्याला पितृत्त्वाची भावना जाणवू  लागली आहे. याच भावनेला मनात ठेऊन कोहलीने सॅनिटायझेशन ब्रँड वाईजच्या प्रमोशनमधून मिळणारी रक्कम कुपोषित बालकांसाठी दान देण्याचे ठरवले आहे. वाईजने अलीकडेच कोहलीची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली होती. कोहलीने दान केलेली रक्कम महाराष्ट्रातील एक लोकाभिमुख संस्था राह फाउंडेशनला देण्यात येणार असून ती कुपोषित व वंचित मुलांच्या उत्कर्षासाठी काम करते.

वाईज यांच्या सहकार्याबद्दल कोहली म्हणाला, “एक खेळाडू म्हणून आम्हाला खूप प्रेम मिळते. आमची नायकांसारखी पूजा केली जाते पण या कठीण काळात कोविड-१९  योद्धा आपले खरे नायक आहेत, ते इतरांना वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतात. वाईजसोबत जोडले गेल्याचा मला खूप आनंद आहे, कारण वाईज फक्त जागतिक स्तरावरची उत्पादने बनवत नाहीत तर आपल्याला सामाजिक कार्यात हातभार लावण्याची संधी उपलब्ध करून देतात. वाईजसोबत काम करताना माझा उत्साह वाढतो, कारण वाईजकडून मिळणाऱ्या या माझ्या उत्पन्नाद्वारे भारतात कुपोषणाविरूद्ध लढा देण्याच्या उद्दीष्टात सामील होत आहे."

कोहलीने रजा घेतली आहे

कोहली ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर असून तेथे एकदिवसीय आणि टी -२० मालिकेत भाग घेणार आहे. कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा डिसेंबरमध्ये आई होणार आहे आणि म्हणूनच ऑस्ट्रेलियाबरोबर चार कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या सामन्यानंतर कोहलीने पितृत्वाची रजा घेतली आहे. तो ऍडलेड येथे होणाऱ्या पिंक बॉल टेस्टमध्ये खेळल्यानंतर मायदेशी परतणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही पहिली डे-नाईट टेस्ट असेल.

महाराष्ट्रातील 10 हजार मुले कुपोषणापासून मुक्त होतील

वाईजचे विकले जाणारे प्रत्येक उत्पादन कुपोषित मुलांसाठी उपयुक्त ठरेल आणि आता कोहलीने कुपोषणाविरूद्धच्या लढ्यात स्वत: ला गुंतवले आहे. विराट कोहली फाउंडेशनच्या सीएसआर अंतर्गत महाराष्ट्रात कुपोषणातून १०,००० मुले मुक्त होतील.

वाईजचे संस्थापक अक्षत जैन म्हणाले, "आम्ही विराटची तत्परता, शिस्त, अखंडता आणि त्याची व्यक्तिमत्त्व दर्शविणारी जागतिक स्तरावरील मूल्ये यासाठी त्याला ब्रँड अँम्बेसेडर म्हणून निवडले आहे. आमचा ब्रँड आणि कोहलीची मानके एकमेकांना पूरक आहेत असे दिसते. आम्हाला आनंद आहे की आमच्या माध्यमातून तो सामाजिक परिवर्तनाच्या एका उपक्रमात भाग घेत आहे."

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी